पाकिस्तानी लोकांना हवंय भारतीय नागरिकत्व! आले एवढे अर्ज

80

भारतीय नागरिकत्वासाठी अनेक लोक आग्रही असतात. 14 डिसेंबर 2021 पर्यंत विविध देशांमधून भारतीय नागरिकत्त्वासाठी तब्बल 10 हजार 635 लोकांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 70 टक्के म्हणजे 7 हजार 306 अर्ज पाकिस्तानातून आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे.

विविध देशांमधून अर्ज

भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी 14 डिसेंबर 2021 पर्यंत दाखल 10 हजार 635 अर्जदारांपैकी तब्बल 7 हजार 306 अर्ज हे पाकिस्तान, 1 हजार 152 अफगाणिस्तान, त्यानंतर 428 स्टेटलेस, 223 श्रीलंका आणि यूएसए, नेपाळमधून 189 तर, बांगलादेशातून 161 अर्ज आल्याचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले आहे. तर, चीनमधील तब्बल 10 अर्जदारांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केल्याचेही ते म्हणाले.

( हेही वाचा : राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी )

मोठ्या प्रमाणावर नागरिकत्व बहाल

दरम्यान, भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार एमएचएकडे आहे. ज्याची तपशीलवार पडताळणी केल्यानंतरच अर्ज मंजूर केला जातो असे राय यांनी यावेळी स्पष्ट केले. सुधारित नागरिकत्व कायदा बराच वादग्रस्त ठरला आहे. अद्याप या कायद्याची नियमावली तयार व्हायची आहे. मात्र, सरकारनेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2018 पासून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधील अल्पसंख्यांकांना मोठ्या प्रमाणावर नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या तीन देशांमधील अल्पसंख्यांक धर्माचे म्हणजेच हिंदू, शिख, जैन आणि ख्रिश्चन समाजाच्या 8 हजार 244 लोकांनी भारतीय नागरीकत्त्वासाठी अर्ज केला होता. यापैकी, 3 हजार 117 जणांना या डिसेंबरपर्यंत नागरिकत्व देण्यात आलं आहे. तसेच 2018 ते 2020 दरम्यान, जगभरातील परदेशी नागरिकांमध्ये 2 हजार 254 जणांना नागरिकत्व देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.