माटुंगा वर्कशॉपमध्ये आला अनोळखी पाहुणा!

86

माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये सोमवारची सकाळ काहीशी वेगळीच ठरली. एरव्ही वर्कशॉपमध्ये कामगार मशीन्ससोबतच दिवस ढकल्याची सवय असताना सोमवारी सकाळी मुंबईचा गुलाबी पंखाचा पाहुणा वर्कशॉपमध्ये दाखल झाला. या घटनेने गोंधळलेल्या कामगाराने लांब पायाच्या छोट्या आकाराच्या पाहुण्याला ओळखलेच नाही. अखेर या पक्ष्याच्या फोटो काढत सर्वांना विचारायला सुरुवात केली, अखेरीस हा पाहुणा फ्लेमिंगो पक्षी असल्याचे कामगारांच्या लक्षात आले. दादर, माटुंगा, माहिम परिसरात फ्लेमिंगो पक्षी यााआधी आढळून आलेला नसताना पक्षीप्रेमींनाही ही घटना आश्चर्यजनकच ठरली.

(हेही वाचा – वणी गडावरील सप्तशृंगीचे मंदिर दीड महिना बंद! भक्तांसाठी अशी असणार व्यवस्था)

परतीच्या मार्गात गोंधळ उडाल्याने फ्लेमिंगो माटुंग्यात

माणसांपासून पळणा-या या पक्ष्याला कोण घेऊन जाईल ही विचारपूस सुरु झाली. परळ रुग्णालयापासून सर्वांना कामगाराने फोन करायला सुरुवात केली. अखेरीस कामगाराला ‘प्लान्ट एनिमल वेल्फेअर सोसायटी’ (पॉज) या पक्षीप्रेमी संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक मिळाला. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आम्हांला फ्लेमिंगो पक्षी माटुंगा वर्कशॉपमध्ये आल्याचे संबंधित कामगाराने फोन करुन सांगितले.

flamingo 2

फ्लेमिंगो हा लाजाळू पक्षी असतो. त्याला माणसांपासून अलिप्त राहणे आवडते. पावसाळ्यात मुंबईचा हा पाहुणा खाडी किना-यावरील जागा सोडून मूळ अधिवासात परततो. परतीच्या मार्गातही फ्लेमिंगो थवेच्या थवे एकत्र परत जातात. मात्र हा फ्लेमिंगो एकटाच माटुंगा वर्कशॉपमध्ये आम्हांला आढळला. परतीच्या मार्गात गोंधळ उडाल्याने फ्लेमिंगो माटुंगा परिसरात आल्याचा अंदाज पॉजचे प्रमुख सुनीश कुंजू यांनी व्यक्त केला.

वर्कशॉपमध्ये आढळला लेसर फ्लेमिंगो पक्षी 

लेसर फ्लेमिंगो प्रजातीचा हा पक्षी आम्हांला वर्कशॉपमध्ये आढळला. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. प्लेमिंगोला आम्ही तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिका-यांना दाखवले. त्यानंतर आम्ही फ्लेमिंगोला ठाणे फ्लेमिंगो अभयारण्यातील बचाव केंद्रातही तपासणीसाठी नेले. फ्लेमिंगो पक्षी व्यवस्थित असल्याने आम्ही तातडीने फ्लेमिंगो पक्ष्याला नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे कुंजू यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.