Tree : रडणारं झाड? गेली १५० वर्षे या झाडातून निघतंय पाणी

मलबेरीचे झाड जवळपास १५० वर्षे जुने आहे आणि १९९० पासून या झाडाच्या खोडातून एखादा नळ किंवा पाण्याचा पंप बसवल्यासारखे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

296

या सोशल मीडियाच्या युगात काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक. जगातल्या चित्र विचित्र गोष्टी आपल्याला सोशल मीडियामुळे कळत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपण पहिला असेल. नसेल पाहिला तर आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहेत.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. कारण या व्हिडिओमध्ये एका झाडाच्या खोडातून चक्क पाणी बाहेर येताना दिसते. हे पाणी कमी प्रमाणात वाहत नाही तर झाडाला एखादा नळ बसवल्यासारखे प्रचंड प्रहावाने वाहते आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत बारा लाख सोशल मीडिया युजर्सनी पहिला आहे. एवढेच नाही तर हा व्हिडीओ पाहणारे लोक आश्चर्याने थक्क होत आहेत.

तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहू शकता:

 व्हिडिओमध्ये दिसणारे हे मलबेरीचे झाड जवळपास १५० वर्षे जुने आहे आणि १९९० पासून या झाडाच्या खोडातून एखादा नळ किंवा पाण्याचा पंप बसवल्यासारखे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. झाडाच्या खोडातून पाणी येताना तसे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते पण सन १९९० पासून सतत नळासारखे पाणी वाहताना पाहणे हे आश्चर्यचकित करण्यासारखं आहे.

आतापर्यंत बारा लाख सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडीओ पहिला असून कित्येक लोकांनी असे का होत असावे? याचे वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली आहे. पण जगात चमत्कार नसतात, तर त्यामध्ये विज्ञान दडलेले असते. तुमच्याकडे यामागचे वैज्ञानिक कारण असेल तर आम्हाला नक्की कळवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.