लतादीदी यांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ संगीतकार आणि गायक तथा लतादीदींचे कनिष्ठ बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने ते येत्या ८-१० दिवसांत घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, अशी माहिती त्यांचे पुत्र आदिनाथ यांनी दिली. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

(हेही वाचा – अटारी सीमेवर 700 कोटींचे हेरॉईन जप्त, अफगाणिस्तानातून आली 102 किलोची खेप)

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत पार पडला. त्या कार्यक्रमातही हृदयनाथ मंगेशकर उपस्थित नव्हते. या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती.

मोदींनी दिल्या तब्येत बरी होण्यासाठी शुभेच्छा 

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत, त्यामुळे ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यानंतर भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, ज्येष्ठ गायिका अशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

पुरस्कार देशवासियांना समर्पित! 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  मी पुरस्कार स्वीकारण्यापासून दूरच असतो, पण मंगेशकर कुटुंबाचा पुरस्कार स्वीकारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांना नकार देणे माझ्यासाठी शक्यच नाही, मी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करत आहे, कारण ज्याप्रकारे लता दीदी जनजनात होत्या, तसा हा पुरस्कारही आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here