संगीत विषयाचा मी विशेष ज्ञानी नाही. संगीत एक साधना आणि भावना आहे. संगीत तुम्हाला वैराग्याची अनुभूती देते, तुमच्यात वीररस निर्माण करते, राष्ट्रभक्ती निर्माण करते, संगीताच्या या सर्व छटा आपल्याला लता मंगेशकर यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवा येतात. माझ्यासाठी लता दीदी सूरसम्राज्ञीसह माझ्यासाठी मोठी बहीण होती. मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याकडून मला अपार प्रेम मिळाले, अनेक वर्षानंतर राखी पौर्णिमा येईल तेव्हा दीदी नसणार आहे, असे भावुक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, ज्येष्ठ गायिका अशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुरस्कार देशवासियांना समर्पित!
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी पुरस्कार स्वीकारण्यापासून दूरच असतो, पण मंगेशकर कुटुंबाचा पुरस्कार स्वीकारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांना नकार देणे माझ्यासाठी शक्यच नाही, मी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करत आहे, कारण ज्याप्रकारे लता दीदी जनजनात होत्या, तसा हा पुरस्कारही आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव)
मंगेशकर कुटुंबांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग
मनुष्य त्याच्या वयाने नाही, तर कार्याने मोठा असतो, असे लता दीदी सांगत. लता दीदी वयानेही मोठ्या होत्या आणि कर्मानेही मोठ्या होत्या. त्या सरलताचे प्रतिरूप होत्या. त्यांच्यातून माता सरस्वतीची अनुभूती येत असत. सिनेमातील ५ पिढीला त्यांनी आवाज दिला. भारतरत्न पुरस्कार दिला. विश्व त्यांना सूरसम्राज्ञी समजत, पण त्या स्वतःला सुरांची दासी समजत. ईश्वराचा उच्चार हा स्वराशिवाय अपूर्ण आहे. संगीत आपल्या शरीरावर परिणाम घडवत असते, लता दीदींनी देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाला आवाज दिला. या पुरस्कारात दीनानाथ मंगेशकर यांचे नाव जोडले आहे. मंगेशकर कुटुंबांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
दीनानाथ मंगेशकरांनी ब्रिटिश व्हॉइसरॉयसमोर वीर सावरकरांचे काव्य गायले
ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या समोर दीनानाथ मंगेशकर यांनी वीर सावरकर यांचे काव्य गायले होते, ते केवळ दीनानाथ मंगेशकर हेच करू शकतात, वीर सावरकर यांनी ते काव्य ब्रिटिश राजवटीला आव्हान देणारे होती. वीर सावरकर यांनी शिवरायांवर लिहिली प्रार्थना, रामदास स्वामी यांनी लिहिलेले काव्य हेही लता दीदी यांनी गायले होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. लता दीदींचा स्वर भारतातील बहुतांश राज्यातील भाषांशी जोडलेला आहे. त्यांनी धर्मग्रंथ, संतवचने, साहित्य वचने ही सर्व लता दीदींनी गायली आहेत. पुण्यात त्यांनी त्यांची कमाई मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने गरीबांसाठी हॉस्पिटल बांधण्यासाठी खर्च केली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारचे केले ५ पर्याय देऊन वर्णन)