स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना दुर्लक्षित!

143

१६ सप्टेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत रस्ते अपघात विमा योजना बाबतीत चर्चा होऊन या योजनेची स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १४ ऑक्टोबर २०२० अंमलबजवाणी देखील झाल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळून मृत्यू दर तसेच अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल हा प्रामाणिक उद्देश सरकारचा होता व त्याबद्दल सरकारचे सर्व स्तरातून कौतुक देखील झाले.

या योजनेला मंजुरी मिळून तब्बल १ वर्ष होऊन गेले तरी अद्याप एकही रुग्णालय या योजनेअंतर्गत जोडले नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतीत रुग्णमित्र राजेंद्र ढगे गेली एक वर्ष सरकार कडे पाठपुरावा करत आहेत. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांपासून ते नेत्यांपर्यंत या रस्ते अपघात विमा योजनेबाबत चर्चा केली, पण कुणालाही या योजनेचे सोयर सुतक नसल्याचे आढळून आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारणा केली असता अजून कालावधी जाईल हेच उत्तर मिळते; जर योजनेला अवधी जाईल तर मग तसे स्पष्ट लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सरकारचे आहे.

( हेही वाचा : मध्य वैतरणा जलाशयातून होणार १०० मेगावॅटची अक्षय ऊर्जानिर्मिती, देशातील पहिलाच प्रकल्प )

सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

१४ ऑक्टोबर २०२० ला शासन निर्णय जाहीर करून नागरिकांची वाहवा घ्यायचा अट्टाहास का केलात? नागरिकांची दिशाभूल करून साहेबांच्या नावाने सरकार फसवणूक करत असल्याची खंत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली. हिंदूहृदयसम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शक्ती स्थळावर जाऊन पोस्टर द्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रुग्ण मित्र राजेश ढगे यांनी केला. आता हिंदूह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त शिवसेना भवन येथे जाऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. किमान आता तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात जातीने लक्ष देऊन ही योजना कार्यान्वित करून स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा प्रचार प्रसार जनजागृती करतील अशी अपेक्षा रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली आहे. https://we.tl/t-BUoQl0bXvB ह्या लिंकवरून आपण दृक्‌श्राव्य माध्यमातून रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांची भूमिका जाणून घेऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.