Phone Tapping Case: ‘या’ नावांनी राऊत आणि खडसेंचे फोन टॅप केले जात होते ACPची खळबळजनक साक्ष

फोन टॅपिंग प्रकरणात जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्यांच्याच विभागात काम करणा-या सहायक पोलीस आयुक्तांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. फोन टॅपिंग करणे हे बेकायदा असल्याने, नकार देऊनही रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करायला लावल्याचे या एसीपीने जबाबात म्हटले आहे.

अशी होती राऊत आणि खडसेंची नावे

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅंपिग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी कुलाबा पोलिसांनी 750 पानांचे आरोपपत्र दाखल केले. संजय राऊत यांच्यासाठी एस. रहाटे आणि खडसेंसाठी खडासने या नावाचा वापर करुन हे दोघेही समाजविघातक कृत्य करीत असल्याचे शुल्का यांनी भासवले, असे या अधिका-याचे म्हणणे आहे.

20 शासकीय कर्मचा-यांचे जबाब

या फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये 20 शासकीय कर्मचा-यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले होते. ते जबाबही आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत.

( हेही वाचा: ED Summons : भावना गवळी हाजीर हो …ईडीकडून चौकशीसाठी समन्स )

समिती स्थापन करण्यात आली होती

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य सरकराने पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने चौकशीचे आदेश दिले होते. या त्रिसदस्यीय समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here