लातूरमध्ये अपघातात सात वाहने जळून खाक; ट्रक चालकाचा मृत्यू, पाच जखमी

135

लातूरमध्ये झालेल्या एका अपघातात सात वाहने जळून खाक झाली आहेत. भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे ही घटना घडली. सुरुवातीला लातूर शहरातून उदगीरकडे जाणा-या टॅंकरला आग लागली. काही कळण्याच्या आताच आगीने रौद्र रुप धारण केले आणि यात सात वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान या घटनेत ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथके घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर- उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. लातूर शहरातून उदगीरकडे जाणा-या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

सात वाहने जळून खाक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचा अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहने एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वाहनांमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टॅकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी महामंडळाची बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्राॅली नसेलेले वाहन यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.