लातूर- पुणे एसटी बसचा भीषण अपघात; 45 प्रवासी जखमी, 14 जणांची प्रकृती गंभीर

147

लातूर जिल्ह्यातील (Latur) बोरगाव काळे परिसरात एसटी (ST) बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. एसटीतील (MSRTC)45 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या अपघातात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लातूर- पुणे वल्लभनगर (Latur Pune Vallabhnagar)  ही एसटी निलंगा आगारातून पुण्याच्या (Pune) दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरुन बस खाली उतरली. बसमधील प्रवासी जोरात आदळले गेले. याशिवाय एसटी बसची पुढील काच तुटल्याने अनेक प्रवाशांना गंभीर इजा झाली आहे.

( हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना )

अपघाताचे कारण काय?

लातूर- पुणे या एसटी बसचा स्टेअरिंग राॅड अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस  रस्त्यावरुन खाली उतरत मातीच्या ढिगा-यावर जाऊन आदळली. बसचा समोरील भाग ढिगा-यावर जोरदार आदळल्याने चालकाला दुखापत झाली आहे. तर अन्य प्रवाशांनाही गंभीर इजा झाली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावून जखमींना तातडीने उपचारासाठी मुरुड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.