लातूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातलं एक जिल्हा आहे. लातूर हे अनेक ऐतिहासिक वास्तूंनी लेण्यांनी वेढलेलं एक पर्यटन केंद्र आहे. लातूरमध्ये सर्वाधिक मराठी भाषा बोलली जाते. या शहराची शैक्षणिक गुणवत्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करते. (Latur)
लातूर जिल्हा हा शहर आणि ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई असलेला दुष्काळी भाग आहे. इथली अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पण अलीकडच्या काळात शैक्षणिक क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या व्यवसायांनीही जोर धरला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास अतिशय कमी प्रमाणात आहे. लातूर हा जिल्हा विनाशकारी भूकंपाच्या केंद्रापासून ४३ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. (Latur)
◆ लातूर इथलं शिक्षण आणि संशोधन
लातूर हे माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षणाचं शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित झालं आहे. लातूर हा जिल्हा महाराष्ट्रात त्याच्या “लातूर पॅटर्न” अभ्यासासाठी ओळखला जातो. लातूरमधल्या कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. (Latur)
◆ लातूर इथला व्यापार आणि उद्योग
लातूर शहर हे प्रामुख्याने ऊस, खाद्यतेल, सोयाबीन, द्राक्षे आणि आंबा यांचं उत्पादन केंद्र आहे.
(हेही वाचा- Dhule Railway Station : धुळे रेल्वे स्टेशन इतिहास माहित आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया…)
तेलबिया हे लातूर विभागाचं प्रमुख उत्पादन होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केशवराव सोनावणे यांनी डालडा कारखाना स्थापन केला होता. हा कारखाना म्हणजे सहकारी अटींवर स्थापन करण्यात आलेली आशियातील पहिली तेल गिरणी होती. (Latur)
१९९० सालापर्यंत लातूर हे औद्योगिकदृष्ट्या मागासलेलं शहर होतं. १९६० सालामध्ये मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हाच तो काळ होता जेव्हा मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. त्या काळात नेमून दिलेल्या मागास क्षेत्राच्या लाभांच्या माध्यमातून तत्कालीन सहकारमंत्री केशवराव सोनवणे यांच्या कार्यकाळात लातूरला पहिली एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन उभारण्यात आली. (Latur)
या एमआयडीसीने जमीनी संपादन करून औद्योगिक वसाहती उभारायला सुरुवात केली. तेव्हाच लातूर येथे औद्योगिक विकासाची सुरुवात झाली. लातूरमध्ये शेती उत्पादनं, खाद्यतेल, बायोटेक, कंझ्युमर ड्युरेबल्स, प्लास्टिक प्रक्रिया आणि ॲल्युमिनियम प्रक्रियेमध्ये अनेक कंपन्यांचे उत्पादन कारखाने आहेत. पण त्यांपैकी बहुतेक लघु आणि मध्यम स्वरूपातले शेती व्यवसायच आहेत. (Latur)
लातूरमध्ये भारतातलं सोयाबीनचं सर्वांत मोठं व्यापारी केंद्र आहे. तसंच महाराष्ट्राचा ‘शुगर बेल्ट’ म्हणून ओळखली जाणारी ग्रीन सिटी लातूर येथेच आहे. या जिल्ह्यात ११ पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. म्हणूनच लातूर हा भारतातल्या सर्वाधिक साखर उत्पादक जिल्ह्यांमध्ये गणला जातो. (Latur)
तसंच येथे तेलबिया, शेतमाल आणि फळांची बाजारपेठही आहे. याव्यतिरिक्त लातूर हे उच्च दर्जाच्या द्राक्षांसाठी देखील ओळखलं जातं आणि अनेक प्रशासकीय आणि खाजगी मालकीच्या कोल्ड स्टोरेज सुविधा येथे आहेत. (Latur)
लातूर शहरापासून १८ किलोमीटर एवढ्या अंतरावर औसाजवळ १.४२ चौरस किलोमीटर म्हणजेच ३५० एकरच्या परिसरात द्राक्ष वाइन पार्क प्रकल्प आहे. याव्यतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे १.२ चौरस किलोमीटर म्हणजेच ३०० एकर मध्ये पसरलेल्या लातूर फूड पार्कचं बांधकाम सुरू आहे. लातूर हे दक्षिण भारतातलं प्रमुख वाहतूक जंक्शन आहे. (Latur)
हेही वाचा-
Join Our WhatsApp Community