रात्रं-दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग… असे तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवले आहे. त्याप्रमाणे आपण विविध युद्धाचे प्रसंग पाहतच आहोत. त्यातून मार्ग कसा काढायचा, याचा उत्साह आजचा दिवस देतो. कारण आज चैत्राचा पहिला दिवस, वसंत ऋतूची सुरुवात आहे. ओम प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या या चळवळीत प्रत्येक हिंदू (Hindu) व्यावसायिकाने सहभाग घेतला पाहिजे, अनेकांपर्यंत ही चळवळ पोहोचवली पाहिजे. हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी-विक्री व्यवहार ठेवायला हवा, असे आवाहन राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
हिंदू (Hindu) नववर्ष, चैत्र शुक्ल १, रविवार ३० मार्चला गुढीपाडव्यापासून या अभियानाला डोंबिवली येथील शिदोरी उपहारगृह येथून प्रारंभ करण्यात आला. ज्या अंतर्गत ओम प्रमाणित ग्राहकांची विनाशुल्क नोंदणी सुरू करण्यात आली. गुढीपाडवा या हिंदू नव वर्षाचे औचित्य साधून आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखा आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजिरी मराठे, राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी आणि हिंदू (Hindu) जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे डोंबिवली शहर प्रमुख मंगेश राजवाडे, प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक अमोल कोगेकर, ओम प्रतिष्ठानचे समन्वयक प्रसाद वडके, ध्रुव अकॅडमीचे संचालक विनोद देशपांडे, वृषाली देशपांडे, प्राचार्य डाॅ. विनय भोळे, सनातन संस्थेच्या अमृता संभूस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रघुवीर नगर गणेशोत्सव मंडळाचे डोंबिवली अध्यक्ष बिनेश नायर आणि मंडळाचे सदस्य यांचे विशेष योगदान लाभले. डोंबिवलीतील प्रथम ओम प्रमाणित उद्योजक शिदोरी उपहारगृहाचे संचालक अद्वैत जोशी यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने www.ompratishthan.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्वांना हिंदूंची अर्थव्यवस्था निर्माण करावीच लागणार – दुर्गेश परुळकर
व्यावसायिक क्षेत्रात जशी हलाल प्रमाणित उत्पादने सर्रास विक्री केली जातात, तशीच आता शासनाने जबाबदारी घेऊन ओम प्रमाणपत्राला मान्यता द्यावी आणि हिंदूंचे (Hindu) रक्षण करण्याचे दायित्व स्वीकारावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की, हे इस्लामिक राष्ट्र नव्हे, हे हिंदवी स्वराज्य आहे आणि आता हे आपल्याला जगालाही ठणकावून सांगायचे आहे. त्यासाठी आजचा हा मुहूर्त आपण साधला आहे. ही गुढी यानिमित्ताने आपण उभारली आहे आणि ती उंचच उंच आभाळापर्यंत पोहोचली पाहिजे. या माध्यमातून हिंदूंचं एक मोठे संघटन झाले, तर त्यातून चांगला संदेश जगाला जाईल. यातून विश्वगुरुपदाचा मान आपल्याला स्वाभाविक मिळेल, हेच आपले अंतिम उद्दीष्ट आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी केले.
प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिंदुस्थानची आर्थिक व्यवस्था ढासळून टाकण्याचा एक कुटील डाव मुसलमानांकडून चालवला आहे. त्याला संविधानिक प्रतिरोध करून आपल्या सर्वांना हिंदूंची (Hindu) एक अर्थव्यवस्था निर्माण करावीच लागणार आहे. आपल्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य दोन्हीही टिकवण्यासाठी पहिले पाऊल म्हणून ओम प्रमाणपत्राची नितांत आवश्यकता आहे. या माध्यमातून विक्रेता वर्ग हा सजग होण्यासाठी प्रचार प्रसार करावा लागणार आहे. कारण हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जो काही पैसा मुसलमानांकडे जातो, तो पैसा आपल्या राष्ट्र आणि संस्कृतीच्या विरोधात उपयोगात आणला जातो. त्याला रोखायचे असेल तर आपल्याला आपली दुसरी अर्थव्यवस्था निर्माण करावी लागेल. त्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय आणि सांस्कृतिक कर्तव्य पार पाडलं पाहिजे. या प्रमुख उद्देशातून ग्राहक जागृती अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन दुर्गेश परुळकर यांनी केले.
ओम प्रमाणपत्र चळवळीला हिंदू जनजागृती समितीचा पाठिंबा – कोचरेकर
आजच्या हिंदू (Hindu) जागृती अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी चळवळ सुरू झाली होती आणि स्वातंत्र्याच्या मोहिमेला योगदान प्राप्त झाले अशाच प्रकारे आज ओम प्रमाणपत्राच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. ओम प्रमाणपत्राची आवश्यकता का आहे, हे समजण्यासाठी हलाल प्रमाणपत्राच्या मागील षडयंत्र जाणून घ्यावे लागेल. थुंक, फूंक, मांस भेसळयुक्त अन्न हिंदूंना खाऊ घालणे, हे हलाल जिहादच्या माध्यमातून चालणारं हिंदूंविरोधी षडयंत्र आहे आणि यापासून हिंदूंना (Hindu) वाचायचे असेल तर त्र्यंबकेश्वरच्या पुण्यभूमीतून ओम प्रमाणपत्राच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ संपूर्ण जगभरात पसरेल आणि प्रत्येक हिंदु ग्राहक आणि विक्रेता ओम प्रणाणित असेल, याची आम्हाला खात्री आहे. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही या चळवळीला संपूर्ण पाठिंबा देत आहे, असे आम्ही घोषित करतो, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर म्हणाले.
हिंदू जागृतीचा शुभारंभ ही तर हिंदू संघटनेची नांदीच – श्रीनिवास कुलकर्णी
आपल्या सण, उत्सव आणि मंदिरांबाहेर जिथे बहुसंख्य हिंदू (Hindu) दुकानदार असतात, परंतु तेथे काही अल्पसंख्याक विक्रेतेही असतात आणि केवळ काही पैसे कमी म्हणून हिंदूंची त्या अल्पसंख्यांक विक्रेत्यांकडे गर्दी असते हे मी अनुभवले आहे, हे दुर्दैव आहे. हिंदू ग्राहकांना जागृत करणे, हिंदू (Hindu) व्यावसायिकांना ओम प्रणाणित करणे यासाठी आजच्या नववर्ष स्वागतयात्रेत मोठ्या संख्येने आम्ही सहभागी झालो आहोत. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आणि ‘ओम प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ ही तर हिंदू (Hindu) संघटनेची नांदीच आहे, असे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले.
Join Our WhatsApp Community