मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेसमध्ये Vistadome Coach ची सुरुवात, बघा फोटो

तेजस एक्स्प्रेसचा मडगाव जंक्शनपर्यंत विस्तार

गुरूवार 15 सप्टेंबरपासून मध्य रेल्वे मुंबई – करमळी तेजस एक्स्प्रेसला एक विस्टाडोम कोच जोडणार आहे. मुंबई – मडगाव विभागातील हा दुसरा विस्टाडोम कोच आहे. 12051/12052 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला एक विस्टाडोम कोच आधीच जोडलेला आहे. मध्य रेल्वे 5 व्हिस्टाडोम कोच चालवत असून तेजस एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडल्याने ती संख्या आता एकूण 6 होणार आहे.

आधीच जोडलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत:

मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन, मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस, पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस.

 

विस्टाडोम कोच 22119/22120 मुंबई – करमळी तेजस एक्स्प्रेसला दि. 15.9.2022 ते 31.10.2022 पर्यंत (पावसाळी वेळापत्रकानुसार) जोडला जाईल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विस्टाडोम कोचसाठी बुकिंग आधीच सुरू झालेले आहे.

तेजस एक्सप्रेसचा करमळी ते मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार

22119 तेजस एक्सप्रेस दि. 01.11.2022 पासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 05.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.40 वाजता मडगावला पोहोचेल.

करमळी येथून सुटणारी 22120 तेजस एक्स्प्रेस दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दि. 1.11.2022 पासून मडगाव येथून 15.15 वाजता (करमळी 14.40 वाजता ऐवजी) सुटेल आणि त्याच दिवशी 23.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

  • थांबेः दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, करमळी
  • संरचनाः एक विस्टाडोम कोच, 11 वातानुकूलित चेअर कार, एक वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि दोन सामान, जनरेटर कम ब्रेक व्हॅन.
  • आरक्षण: दि. 1.11.2022 रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/मडगाव येथून सुटणाऱ्या तेजस एक्सप्रेससाठी बुकिंग दि. 17.9.2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

प्रवाश्यांनी कृपया नोंद घ्यावी:

• ट्रेन क्रमांक 22119 मधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी दि. 22.10.2022 व 29.10.2022 रोजी तसेच ट्रेन क्रमांक 22120 ला दि. 23.10.2022 व 30.10.2022 रोजी व्हिस्टाडोम कोचऐवजी एक वातानुकूलित चेअर कार जोडले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here