‘लक्झरी स्ट्रीट वेअर’ची व्याप्ती दिवसागणिक वाढत असताना, दोन मैत्रिणींनी या क्षेत्रात नवा आविष्कार घडवत ‘नाइन्टीन ओ फोर’ हा ब्रॅण्ड ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. समिक्षा कानोलकर आणि दिशा शाह अशी या मैत्रिणींची नावे आहेत.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मंगळवारी आयोजित केलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘नाइन्टीन ओ फोर’चे लॉन्चिंग करण्यात आले. हा प्रीमियम कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. ज्यात टी-शर्ट, हुडी आदींना प्रिमियम डिझाईनसह प्रस्तूत करण्यात आले आहे. फॅशन डिझायनर आणि ब्रॅण्ड मॅनेजमेंट एक्सपर्ट समिक्षा कानोलकर आणि दिशा शाह यांनी हा नवा कोरा ब्रॅण्ड आविष्कृत केला आहे. समिक्षा हिने इटली येथील एका प्रसिद्ध फॅशन इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतले आहे. तर, दिशा हिने रीजेंट युनिव्हर्सिटी, लंडन येथून लक्झरी ब्रँड मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी संपादीत केली आहे.
नवीन डिझाईन घेऊन येणार…
या नव्या आविष्काराबाबत माहिती देताना समीक्षा कानोलकर म्हणाली, ‘लक्झरी स्ट्रीटवेअर श्रेणीमध्ये वेगळा पर्याय निर्माण करण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी मॅरांगोनी संस्थेकडून मला खूप मदत मिळाली. येत्या काळात प्रीमियम शर्ट आणि कॉर्ड्समध्ये नवीन डिझाईन घेऊन येणार आहोत. XS पासून ते 3XL आकारातील कपडे ‘नाइन्टीन ओ फोर’मध्ये उपलब्ध करून दिले जातील, असेही तिने सांगितले.
(हेही वाचा – Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही – अजित पवार)
पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री
‘नाइन्टीन ओ फोर’च्या पहिल्या दिवसाच्या विक्रमी विक्रीमुळे आम्ही खूप खुश आहोत, अशी प्रतिक्रिया दिशा शाह हिने दिली. त्यासाठी मी आणि समिक्षाने गेल्या ८ महिन्यांत खूप मेहनत घेतली आहे. अशा प्रीमियम ठिकाणी आमचा ब्रँड लॉन्च करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही वेगळा आहे. आमच्या ब्रँडचे अनेकांनी कौतुक केले, त्यामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. दरम्यान, कुलाबा येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या आठ तासांत ‘नाइन्टीन ओ फोर’ ब्रॅण्डची ७० टक्के उत्पादने विकली गेली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community