Law Colleges In Mumbai : तुम्हाला वकील व्हायचं आहे का? मग ‘ही’ आहेत मुंबईतली सर्वात उत्कृष्ट ’लॉ कॉलेज’

मुंबईतील लॉ कोर्सची फी कोर्स आणि कॉलेजवर अवलंबून असते. मात्र साधारण रु. ५,००० ते रु. १०,००,००० पर्यंत फी आकारली जाऊ शकते.

289
Law Colleges In Mumbai : तुम्हाला वकील व्हायचं आहे का? मग 'ही' आहेत मुंबईतली सर्वात उत्कृष्ट ’लॉ कॉलेज’

मुंबईत शैक्षणिक संस्थांची मुळीच कमतरता नाही. अनेक मोठमोठ्या शैक्षणिक संस्था मुंबईत दिमाखात उभ्या आहेत. आता लॉ करायचा असेल तर मुंबईत चांगले कॉलेजेस उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती नसते. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट कॉलेजेसची माहिती देणार आहोत. (Law Colleges In Mumbai)

लक्षात असू द्या की आता आम्ही ज्या महावियालयांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, त्यामधील प्रवेश हे CLAT, LSAT, आणि MAH CET यांसारख्या कायद्याच्या प्रवेश परीक्षेतील गुणांवर आधारित असतात, त्यानंतर GD/PI फेऱ्या होतात. मुंबईतील लॉ कोर्सची फी कोर्स आणि कॉलेजवर अवलंबून असते. मात्र साधारण रु. ५,००० ते रु. १०,००,००० पर्यंत फी आकारली जाऊ शकते. Government Law College हे मुंबईतील सर्वोत्तम शासकीय विधी महाविद्यालय मानले जाते. चला तर जाणून घेऊया मुंबईतील सर्वात उत्कृष्ट लॉ कॉलेजेसबद्दल : (Law Colleges In Mumbai)

(हेही वाचा – IPL 2024 Swapnil Singh : आयपीएलच नाही, तर क्रिकेट सोडणार होता स्वप्निल सिंग, आता ठरलाय बंगळुरूसाठी हीरो)

किरीट पी. मेहता स्कूल ऑफ लॉ :

हे महाविद्यालय LLB, LLM, आणि BA LLB सह अनेक कायद्याचे अभ्यासक्रम प्रदान करते. २०२३ च्या इंडिया टुडे रँकिंगनुसार हे महाविद्यालय भारतात २० व्या स्थानावर आहे. (Law Colleges In Mumbai)

केसी लॉ कॉलेज :

खासकरुन एलएलबी अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाणारे, केसी लॉ कॉलेज हे प्रशस्त असून ही मुंबईतील आणखी एक प्रमुख संस्था आहे. इथे उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते. (Law Colleges In Mumbai)

एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई :

एमिटी युनिव्हर्सिटी चांगल्या दर्जाचा लॉ अभ्यासक्रम प्रदान करते आणि या क्षेत्रात कामगिरी करण्याची चांगली संधी देखील प्रदान करते. (Law Colleges In Mumbai)

गव्हर्नमेंट लॉ कॉलेज (जीएलसी) :

जीएलसी मुंबई हे समृद्ध इतिहास असलेले एक प्रतिष्ठित सरकारी लॉ कॉलेज आहे. यात एलएलबी अभ्यासक्रमासाठी ३०० जागा उपलब्ध असतात. हे मुंबईतील सर्वोत्तम लॉ कॉलेज मानले जाते. (Law Colleges In Mumbai)

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू) मुंबई :

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई हे देखील शहरातील शीर्ष लॉ कॉलेज आहे. हे कॉलेज मुंबईतील सुंदर वातावरणात म्हणजे, हिरानंदनी गार्डब्सन्स, पवई येथे स्थित आहे. त्यामुळे इथला कॅम्पसही अल्हाददायक आहे. (Law Colleges In Mumbai)

लॉर्ड्स युनिव्हर्सल कॉलेज :

लॉर्ड्स युनिव्हर्सल कॉलेज हे खूपच प्रशस्त महाविद्यालय आहे. इथे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. जरी हे केवळ कायदा महाविद्यालय नसले तरी इथे कायद्याशी संबंधित कार्यक्रम प्रदान केला जातो आणि उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. (Law Colleges In Mumbai)

मुंबई विद्यापीठ :

मुंबई विद्यापीठ मुंबईतील आणखी सर्वात मोठे महाविद्यालय. या विद्यापीठात अनेक विभाग आहेत. त्यपैकी मुंबई विद्यापीठात कायदा विभाग देखील आहे आणि ते दर्जेदार कायदेशीर शिक्षण प्रदान करते. या विद्यापीठाला महाराष्ट्रभरात खूपच सन्मान प्राप्त झाला आहे. (Law Colleges In Mumbai)

एसएनडीटी महिला विद्यापीठ :

महिलांना समर्पित हे महाविद्यालय देखील खूपच जुने असून इथे उत्तम शैक्षणिक प्रणाली आहे. एसएनडीटी महाविद्यालयामुळे महिलांना १०० पावले पुढे टाकता आली आहेत. या विद्यालयात विविध विभाग असले तरी इथला कायदे विभागही सक्षम आहे. (Law Colleges In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.