सज्जन गडाच्या पायथ्याशी झाले बिबट्याच्या बछड्याचे आणि आईचे मिलन

साताऱ्यातील सज्जन गडाच्या पायथ्याशी बिबट्याचा बछडा एकटा फिरत होता. या भागात पर्यटकांना प्रवेश बंदी असली तरीही स्थानिकांना भर दुपारी पायथ्याजवळ बिबट्याचा बछडा एकटाच फिरत असल्याची माहिती मिळाली. बछड्याबाबत वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी रात्रीच बछडा आणि आईचे मिलन घडवून आणले.

वनविभागाची टीम अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचली

सज्जनगड किल्ल्याच्या पायऱ्या सुरु होण्याच्या भागातील काही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली नाहीत. याच भागात दुपारी बिबट्याचा बछडा स्थानिकांना एकटाच फिरत असल्याचे दिसला. बछड्याबाबत स्थानिकांनी सातारा प्रादेशिक वनविभागाला कळवले. वनविभागाची टीम अर्ध्या तासात सव्वा चार वाजता घटनास्थळी पोहोचली. आमच्यासोबत रेस्क्यू ही पुण्यातील खासगी प्राणीप्रेमी संस्था होती. या संस्थेच्या डॉक्टरांनी बछड्याची तपासणी केली. दीड महिन्यांच्या नर बछड्याची तब्येत व्यवस्थित असल्याने वनविभागाने मंगळवारी संध्याकाळी घटनास्थळीच बछडा आणि त्याच्या आईचे मिलन करण्याचा निर्णय घेतला. तब्ब्ल सव्वा पाच तासांच्या प्रयत्नानंतर बछड्याची आई त्याला घेऊन गेली. हे क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

कारवाई पथक 

ही कारवाई सातारा प्रादेशिक वनविभागाचे वनसंरक्षक उत्तम सावंत, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सातारा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, परळीचे वनपाल अरुण सोळंकी, परळीच्या वनरक्षक साधना राठोड ठोसेघर चे वनरक्षक अशोक मलप, कुसवडेचे वनरक्षक मारुती माने, वनकर्मचारी संतोष दळवी तसेच रेसक्यू आणि सह्याद्री प्रोटेक्टर्स फाउंडेशन या संस्थांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here