तुम्हाला त्वचा दान करायची आहे का?

माणूस मृत्यू पावल्यानंतर शरीरातील अवयव हळूहळू निकामी होतात. या दरम्यान शरीरातील अवयव दान करता येतात. हृदय, मूत्रपिंडे आदी अवयवांसह त्वचाही दान करता येते. मात्र त्वचा दान करण्याबाबत अनेक गैरसमज, अंधश्रद्धा समाजात पसरली आहे. अपघातात भाजलेल्या रुग्णांना मृत रुग्णांकडून मिळालेली त्वचा प्रत्यारोपणाच्या माध्यमातून लावली जाते.

( हेही वाचा : धुळ्यात भीषण अपघात! केमिकल टॅंकरने अनेक वाहनांना उडवले)

मुंबईत भायखळा येथील मसीना रुग्णालय, सायन येथील टिळक रुग्णालय आणि ऐरोली येथील नेशनल बर्न सेंटर येथे त्वचा बँक आहे. त्यापैकी टिळक रुग्णालयातील त्वचा बॅंक सध्या दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे.

त्वचा दानाबाबत

 • त्वचेचा पातळ पापुद्रा मांड्या व पाठीचा भाग येथून घेतला जातो.
 • त्वचादानानंतर संबंधिताला कोणत्याही प्रकारचे कुरुपत्व येत नाही
 • रक्तस्त्राव होत नाही

त्वचादानासाठी पात्र व्यक्ती 

 • १८ वर्ष पूर्ण असलेले
 • त्वचाविकार नसलेली व्यक्ती
 • एचआयव्ही, हेपेटायटीस-सी संसर्ग नसलेली व्यक्ती
 • त्वचेचा कर्करोग नसलेली व्यक्ती

त्वचादानाचे फायदे

 • जंतूसंसर्गापासून संरक्षण
 • जखमा लवकर भरतात
 • वेदनाशमक
 • रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते

त्वचादानासाठी इच्छुक रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी माहिती

 • दात्याच्या मृत्यूनंतर बर्न्स हेल्पलाईनवर संपर्क साधा – २७७९३३३३
 • दोन तासांच्या आत त्वचारोपण करणारी टीम रुग्णालयात पोहोचले.
 • मांड्या आणि पाठीवरील त्वचा ४५ मिनिटांच्या अवधीत मृत दात्याच्या शरीरावरुन काढल्या जातात.
 • तो भाग पट्टी करुन नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला जातो
 • कुटुंबीयांना या प्रक्रियेअगोदर मृत्यूचा दाखला तयार ठेवणे आवश्यक असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here