बी.एस. चंद्रशेखर हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते. ते क्रिकेट जगतात लेग स्पिनर म्हणजेच फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. चंद्रशेखर, इ.ए.एस. प्रसन्ना, बिशेन सिंह बेदी आणि श्रीनिवास व्यंकटराघवन हे चौघे म्हणजे भारतीय क्रिकेट टीमच्या स्पिनर्सची चौकडी होती. या चौघांनी १९६० ते १९७० सालच्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने धुमाकूळ माजवला होता.
लहानपणी पोलिओ (Polio) झाल्यामुळे चंद्रशेखर यांचा उजवा हात कमकुवत झाला होता. पण त्यांनी त्या आजाराला आपल्या कारकिर्दीच्या यशाच्या आड येऊ दिलं नाही. ते आपल्या क्रिकेटच्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत जवळजवळ अठठावन्न कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी २९.७४ च्या सरासरीने एकूण २४२ विकेट्स घेतल्या.
१९७२ साली चंद्रशेखर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. १९७१ साली त्यांनी ओव्हल येथे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये अडतीस धावांमध्ये सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ठ गोलंदाजीसाठी त्यांना वीस्डेचा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना वीस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. (Polio)
२००४ साली चंद्रशेखर यांना बी.सी.सी.आय ने सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हा पुरस्कार म्हणजे माजी क्रिकेटपटूला दिलेला सर्वोच्च सन्मान मानला जातो. चंद्रशेखर यांचा जन्म १७ मे १९४५ साली म्हैसूर येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षणही तिथेच झालं. लहानपणी चंद्रशेखर हे रिची बेनॉड नावाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची खेळण्याची शैली पाहून खूप प्रभावित झाले. तेव्हाच त्यांना क्रिकेटमध्ये रुची वाटू लागली. पण वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना पोलिओ (Polio) आजाराने ग्रासलं. त्यात त्यांचा उजवा हात कमकुवत झाला होता, ते वयाच्या दहाव्या वर्षी बरे झाले.
त्यानंतर चंद्रशेखर यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांचं कुटुंब बंगळुरू येथे शिफ्ट झालं होतं. ते तिथल्या रस्त्यावर रबरी चेंडूने क्रिकेट खेळायचे. कालांतराने त्यांना ‘सिटी क्रिकेटर्स’ कडून खेळण्याची संधी मिळाली. क्लबकडून खेळताना चंद्रशेखर यांनी वेगवान गोलंदाजीसोबतच गोलंदाजीच्या वेगवेगळ्या शैलींमध्ये खेळण्याचा सराव सुरू केला. १९६३ साली त्यांनी लेगस्पिन गोलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लवकरच भारतीय क्रिकेट संघातर्फे खेळण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी आपली कारकीर्द गाजवली.
Join Our WhatsApp Community