नाशिक शहरात रात्री बिबट्याचे दर्शन; तीन तासांच्या प्रयत्नानंतर जमावापासून वनाधिका-यांनी केली सुटका

114

नाशिक शहरात मंगळवारी रात्री बिबट्या दिसून आला. नाशिक-मुंबई मार्गावरील द्वारका सर्कल येथील मस्जिदजवळील वडाळा रोड येथे पहिल्यांदाच बिबट्या आढळल्याने स्थानिक रहिवासी घाबरले. तब्बल तीन तासांनंतर लोकांची गर्दी सावरत वनाधिका-यांनी बिबट्याला जेरबंद केले. गेल्या दोन वर्षांत नाशिक येथे तब्बल सहावेळा नागरी वस्तीजवळ बिबट्या आला आहे.

संपूर्ण नाशिक शहरात बिबट्यांचे अधूनमधून दर्शन घडत असताना द्वारका सर्कलमध्ये नागरिकांना सायंकाळी साडेनऊ वाजता बिबट्याचे दर्शन झाले. लोकांनी बिबट्याला पळवण्यासाठी हातात काठी घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस आणि वनाधिकारी पोहोचेपर्यंत बिबट्याने एका बंगल्यात धूम ठोकली. बंगल्यातील एका गाडीखाली बिबट्या लपून बसला. मात्र संतप्त जमावामुळे बिबट्याला पकडण्यात वनाधिका-यांना अडचण निर्माण झाली. पहिल्यांदा बिबट्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतर जमावाने थेट बिबट्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वनाधिकारी आणि पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतरही जाळीत अडकलेला बिबट्या निसटला. बिबट्या एका ठिकाणी निपचित पडून राहिल्यानंतर त्याच्यावर वनाधिका-यांनी तसेच इको-एको या प्राणीप्रेमी संस्थेने पुन्हा जाळी टाकली. तीन तासांपासून शांत असलेल्या बिबट्याने यावेळी वनाधिका-यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र बिबट्याला वनाधिका-यांनी सुखरुप पकडून जमावापासून त्याची सुटका केली. बिबट्याची शारिरीक तपासणी केल्यानंतर पाच वर्षांच्या नर बिबट्याची तब्येत व्यवस्थित असल्याचे वनाधिका-यांना समजले. बिबट्याला बुधवारी सायंकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

( हेही वाचा: वीजेच्या धक्क्याने दोन सारस पक्षांचा मृत्यू )

कुठून आला बिबट्या?

नाशिक येथील द्वारका सर्कलपासून जवळपास कुठेही जंगल नाही. दोन किलोमीटरवरील गोदावरी नदीपात्राजवळ बांबू लागवड क्षेत्रात बिबटया आला असावा. रात्री बिबट्याने शहराजवळ प्रवास करताच आपण वाट भरकटल्याचे समजताच त्याने बंगल्यात धाव घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.