भंडा-यात लाखांदूर येथील जंगलात लाकूडतोडीसाठी गेलेल्या इसमावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गेल्या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
असा घडला प्रकार
दहेगाव जंगलात सकाळी सातच्या सुमारास लाकूडतोडीसाठी तीन जण गेले होते. त्यापैकी प्रमोद चौधरी (५४) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने प्रमोद यांना दिडशे मीटर खेचत नेले. प्रमोद यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून इतर दोन जणांनी त्यांच्या आवाजाच्या दिशेने पलायन केले. घटनास्थळी पोहोचताच प्रमोद यांच्यावर वन्यप्राण्याचा हल्ला झाल्याचे पाहताच घाबरलेल्या इतर दोन जणांनी त्यांना न उचलताच जंगलातून पलायन केले. या दोघांनी सुमारे दहा किलोमीटरवरील वनविभागाला भेट देऊन हल्ल्याची माहिती देईपर्यंत सव्वा तास निघून गेले. वनाधिकारी पोहोचेपर्यंत गळ्याभोवती बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे प्रमोद यांचा मृत्यू झाला होता.
(हेही वाचा – बापरे! देवगडच्या समुद्रावर विचित्र आकाराची सुरमई)
वनविभागाने केले असे आवाहन
लाखांदूर येथील जंगल परिसरात गायी आणि बक-यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांची गेल्या दोन-तीन दिवसांपासून नोंद होत होती. तरीही गुरुवारी २७ जानेवारीला जंगलपरिसरात प्रमोद चौधरी आणि इतर दोन जण लाकडे तोडण्यासाठी गेली. या घटनेनंतर जंगलात लाकूडतोडीसाठी जाऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. हल्ल्याच्या ठिकाणी तीन ट्रेप कॅमेरेही वनविभागाने लावले आहेत.
Join Our WhatsApp Community