सांगलीत ऊसतोडणीचा कार्यक्रम जोमात सुरु असताना ऊसाच्या शेतात आईपासून दुरावलेल्या सव्वा महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचे आणि आईचे तीन तासांत वनविभागाने मिलन बनवले. मंगळवारी संध्याकाळी शिवाळा तालुक्यातील वाटेगाव मधील शिवाजी गावडे यांनी दोन दिवसांपूर्वीच शेतातील ऊसतोडणीचा कार्यक्रम हाती घेतला. दुसऱ्याच दिवशी शेतात ऊसतोडणी कामगारांना अगोदर बिबट्या आणि सोबत बछडा फिरत असल्याचे आढळले. या भागांत बिबट्याचा वावर वाढत असताना मजुरांना प्रत्यक्षात बिबट्याची आई आणि बछडा आढळताच गावडे यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. वनाधिकाऱ्यांनी शेताला भेट दिली असता मादी बिबट्या शेजाराच्या शेतात शिरताना त्यांनी प्रत्यक्षात पाहिले. मात्र बछडा मागे राहिला. वनाधिकाऱ्यांनी बछड्याला सोबत घेतले. बछडा आईच्या दूधवार असल्याने त्याची आई जवळपासच असल्याची खात्री होती. बछड्याला छोट्या पेटीत ठेवून बाजूला दोन केमेरे लावले गेले. रात्री नऊच्या सुमारास पेटीजवळ बछड्याची आई आली आणि आपल्या लेकराला घेऊन गेली. आईमुलीचा मिलनाचा तो क्षण केमेऱ्यात कैद झाला.
…आणि दुरावलेलं बिबट्याचं बछडं तीन तासात आईच्या कुशीत आलं#leopardcalf pic.twitter.com/AbAovMeMhy
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 27, 2022
(हेही वाचा -राज्यात अजून दोन दिवस थंडीची लाट… )
सांगली परिसरातील ऊसाच्या क्षेत्रात बिबट्याचा वावर वाढतोय. त्यामुळे स्थानिकांनी बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात सतर्क रहावे. वनविभागाच्या आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे सांगली वनविभागाचे सहाय्यक वनरक्षक अजित सजाणे यांनी सांगितले.
बिबट्याच्या क्षेत्रात वावरताना…
बिबट्याला माणूस भक्ष्य म्हणून आवडत नाही. डोळ्यांना समांतर दिसणा-या बक-या, रानटी मांजर, कोल्हे हे सातारा, पाटण भागांत वावरणा-या बिबट्याचे आवडते भक्ष्य आहे. कित्येकदा माणसाचे लहान मूल भक्ष्य म्हणून पकडल्याचे लक्षात येताच बिबट्या लहान मुलाला सोडून पलायन करतो. परंतु लहान मुले खाल्ल्याचे आतापर्यंत दिसून आलेले नाही. त्यामुळे लहान मुलांना बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात घेऊन जाऊ नका.
० एकटा प्रवास करु नका. माणसांच्या घोळक्यात जाताना मोठमोठ्याने आवाज करा किंवा मोबाईलवर गाणे लावा.
० रात्रीचा प्रवास टाळा. प्रवास करायचा असल्यास हातात टॉर्च आणि काठी असू द्या.
० कचरा व्यवस्थापन योग्यरीतीने करा . गायी, म्हशी, बक-यांना घराच्या खुल्या परिसरात ठेऊ नका.
Join Our WhatsApp Community