मध्य भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर आढळून आले. हे बिबट नरहर गावाजवळ दिसले. मध्य भारतात बिबट मांजर प्रथमच दिसून आले आहे. बिबट मांजर ही जंगली मांजरीनंतर सर्वाधिक आढळणारी प्रजाती आहे. वातावरण अनुकूल लवचिकतेमुळे, ईशान्य भारत, उत्तर हिमालयीन राज्ये, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि पश्चिम घाटात आढळते. मध्य भारतात मात्र बिबट मांजर (Leopard Cat) आढळून येत नाही.
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात 17.7 कोटी मतदार करणार उमेदवारांचे भविष्य सीलबंद)
सर्वात प्राचीन संरक्षित क्षेत्र
ग्रीड बेअरिंग बिबट मांजर मानसिंग देव वन्यजीव अभयारण्याचा (Mansingdeo Wildlife Sanctuary) भाग असलेल्या बफर रेंज ‘नागलवाडी’ रेंजच्या नरहर बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ६६३ मध्ये आढळून आली. वेस्ट पेंच रेंजच्या लगतच्या जंगलाला १९७५ मध्ये राष्ट्रीय उद्यान आणि १९९९ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आणि मध्य भारतीय लँडस्केपमधील सर्वात प्राचीन संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर नरहर गावापासून २ किमी अंतरावर आहे.
भारतात रानमांजरांच्या १० लहान प्रजाती
रान मांजरांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. यात ४० टक्क्यांपेक्षा जास्त विविधता आहे. रानमांजरांच्या भारतात असलेल्या एकूण प्रजातींपैकी १० लहान प्रजाती आहेत. लहान प्रजाती मुख्यतः उंदरांच्या शिकारीमुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय संतुलन राखतात. पण या प्रजातीची माहिती उपलब्ध नाही. (Leopard Cat)
हेही पहा –