मंगळवारी दुपारी येऊर येथे चेन्ना परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. चेन्ना येथील खासगी जागेपासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर बिबट्याचा मृतदेह स्थानिकांना आढळून आल्यानंतर त्यांनी वनअधिका-यांना याबाबतची माहिती दिली.
उंचावरुन पडल्याने बिबट्याचा मृत्यू
ही जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्याबाहेर आहे. वनअधिका-यांना बिबट्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. तीन वर्षांच्या नर बिबट्याचा हा मृतदेह असून वनविभागाच्या नोंदीत त्याचे सी-४० असे नाव असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जून यांनी दिली. उद्यानातील वन्यजीव रुग्णालयात बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनातील अहवालानुसार, बिबट्याच्या शरीरात यकृत फाटल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. कदाचित बिबट्या उंचावरुन पडला असल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाने व्यक्त केला. या घटनेमुळे बिबट्या तणावातही गेल्याने मृत्यू ओढावल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली. या घटनेची चौकशी सुरु असल्याचेही उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जून यांनी सांगितले.
(हेही वाचा राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव…)
Join Our WhatsApp Community