वर्धा मार्गावरील येथील शुअरटेक रुग्णालयाजवळील रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या बिबट्याचा सोमवारी मृत्यू झाला. अपघातात बिबट्याच्या शरीरातील रक्तस्राव झाल्यामुळे सर्व अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या संपूर्ण शरिरात रक्तस्राव झाला होता. मूत्रपिंडे, आतडे, फुफ्फुस हे अवयव पूर्णपणे खराब झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिका-यांनी दिली.
( हेही वाचा : देवनार डम्पिंगवरील कचऱ्यातून ‘पोकलेन’ असेही कमवतात पैसे)
बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. विनोद धूत, डॉ. सुजित कोलंगत, डॉ. मयूर पावसे, डॉ. सुदर्शन काकडे यांनी केले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे प्रतिनिधी अविनाश लोंढे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी कुंदन हाते, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, बुटीबोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे आदी उपस्थित होते.
काय आहे नेमकी घटना –
रविवारी वाहनाच्या धडकेत नर बिबट्याला धडक लागली. अपघातानंतर बिबट्या रस्ता ओलांडून झुडूपात गेला. या घटनेची माहिती पोलिसांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला बेशुद्ध करुन जेरबंद करुन ट्रान्सिट ट्रीटमेंट केंद्रात उपचारांसाठी आणले गेले.
Join Our WhatsApp Community