बिबट्याचा न्यूमोनियाने मृत्यू?

124

पालघर जिल्ह्यात बुधवारी बिबट्या मृतावस्थेत सापडल्याचे समोर आले आहे. दक्षिण मोखाडा या भागात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह वनाधिकाऱ्यांना आढळून आला. बिबट्याचा मृतदेह न्यूमोनिया आजारामुळे झाला असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अंदाजे तीन ते चार वर्ष मृत बिबट्याचे वय असावे, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. घटनास्थळी बिबट्याच्या शरीरावरील सर्व अवयव आढळून आले, त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी नाकारली. बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करण्याची शिवसेनेची मागणी!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.