आरेतून तिसऱ्यांदा बिबट्याला पकडले; आता पुढे काय?

गोरेगाव येथील आरेत युनिट क्रमांक 15 येथून पहाटे दीडच्या सुमारास बिबट्या वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी युनिट क्रमांक 15 मधून बिबटयाच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकारी प्रयत्नशील आहेत. जेरबंद झालेला हा तिसरा बिबटया असून, कॅमेरा ट्रॅपमधील नोंदीनुसार मंगळवारी पहाटे जेरबंद झालेला बिबटया हल्लेखोर नसल्याचे समोर आले आहे. सलग तिसऱ्यांदा पिंजऱ्यात भलताच बिबटया पकडला गेला आहे.
इतिका लोट या दीड वर्षांच्या मुलीचा बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर 26 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबर रोजी दोनदा वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन बिबटे जेरबंद केले. 30 ऑक्टोबर रोजी पकडला गेलेल्या भलत्याच बिबट्याला त्याच दिवशी वनाधिकाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. 26 ऑक्टोबर रोजी पकडलेल्या बिबट्याला गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला वनाधिकाऱ्यांनी मुक्त केले. 11 नोव्हेंबर रोजी बिबट्याने दुसऱ्यांदा आदर्श नगरमध्ये महिलेवर हल्ला झाला. माणसांवर हल्ला करण्यामागे सी 57 ही मादी बिबटया असल्याचा वनाधिकाऱ्यांचा दावा आहे. तिला पकडताना पहिल्यांदा तिचा भाऊ सी 55, आणि तिचा साथीदार पकडला गेला. मंगळवारी पहाटे पकडलेल्या बिबट्याची ओळख मात्र समजली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here