लिटिल मास्टर Sunil Gavaskar यांच्याबद्दल घेऊया जाणून

197
Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा जन्म १० जुलै १९४९ साली मुंबई येथे एका मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मनोहर गावस्कर आणि त्यांच्या आईचं नाव मीनल असं होतं. सुनील मनोहर गावस्कर हे भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. त्यांनी १९७१ पासून ते १९८७ सालापर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलं. गावसकर हे सर्वकालीन श्रेष्ठ सलामीवीर फलंदाजांपैकी एक म्हणजेच ओपनिंग बॅट्समन्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. (Sunil Gavaskar)

सुनील गावस्कर यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. २००९ साली त्यांना ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आलं. २०१२ साली सुनील गावस्कर यांना BCCI कडून माजी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या नायडू जीवन पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. (Sunil Gavaskar)

(हेही वाचा – महायुतीचा मोठा डाव ! Vidhan Parishad Election जिंकण्यासाठी हॉटेल डिप्लोमसी)

भारतीय संघाने १९८४ साली आशिया चषक जिंकला होता. १९८५ साली क्रिकेटची विश्व चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याच काळात सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यात कर्णधारपदाची अनेक वेळेस देवाणघेवाण झाली. कपिल देव यांनी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून देण्याच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच ते आले होते. ते मुंबईचे माजी शेरीफ देखील आहेत. (Sunil Gavaskar)

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचं शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कुल येथून झालं. ते आपल्या शाळेतर्फे क्रिकेट खेळायचे. १९६६ साली भारताचा सर्वोत्कृष्ट स्कुलबॉय क्रिकेटर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. सुनील गावस्कर यांचे काका माधव मंत्री हे माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू होते आणि ते मुंबईच्या सिलेक्शन टीममध्येही होते. त्यामुळे सुनील गावस्कर यांचं भारतीय क्रिकेट टीमसाठी सिलेक्शन झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या सामन्यांत खराब खेळीमुळे त्यांना बऱ्याच उपहासाला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांच्या दुसऱ्या सामन्यांत त्यांनी ११४ धावा केल्या. त्यानंतर १९७०-७१ सालच्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात त्यांची निवड करण्यात आली. (Sunil Gavaskar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.