Dula Bhaya Kag : पद्मश्री संत कवी दुला भाया काग

दुला भाया काग हे प्रसिद्ध संत कवी, समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते.

115
Dula Bhaya Kag : पद्मश्री संत कवी दुला भाया काग
Dula Bhaya Kag : पद्मश्री संत कवी दुला भाया काग

दुला भाया काग  (Dula Bhaya Kag) हे प्रसिद्ध संत कवी, समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९०३ रोजी गुजरातमधील सौराष्ट्रच्या महुवा येथील सोडवदरी गावात झाला. त्यांचे शिक्षण जास्त झाले नव्हते, केवळ पाचवी पर्यंतच त्यांचे शिक्षण होऊ शकले. त्यानंतर ते गुरेढोरे आणि शेती सांभाळू लागले. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता.

ते प्रामुख्याने आध्यात्मिक काव्य रचना करायचे. म्हणूनच भक्त कवी किंवा संत कवी म्हणून ते प्रचलित होते. दुला भाया काग (Dula Bhaya Kag) यांनी स्वातंत्र्य चळवळीत देखील भाग घेतला होता. विशेष म्हणजे त्यांनी आपली जमीन विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसाठी दान दिली होती. इतक्या विशाल मनाचे ते होते.

(हेही वाचा – Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं)

लहानपणी ते खूपच लाजाळू होते असंही ऐकिवात आहे. काग यांनी अनेक भक्तिगीते लिहिली. ही भक्तिगीते रामायण आणि महाभारताच्या तत्वज्ञानावर आधारित होती. त्याचबरोबर त्यांनी गांधीवादी तत्वज्ञानाचा आणि भूदान चळवळीचा प्रचार करण्यासाठी देखील गीते लिहिली.

त्यांनी महात्मा गांधी आणि विनोबा भावेंवर स्तुतीपर गीते सुद्धा लिहिली. त्यांना भगत बापू आणि काग बापू म्हटले जायचे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी १९६२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.