चला जाणून घेऊया The Great Khali बद्दल

124
चला जाणून घेऊया The Great Khali बद्दल
चला जाणून घेऊया The Great Khali बद्दल

दलीप सिंह राणा म्हणजेच द ग्रेट खली (The Great Khali) हा एक भारतीय प्रोफेशनल कुस्तीपटू, कुस्ती प्रवर्तक आणि अभिनेता आहे. त्याचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ साली हिमाचल प्रदेशातल्या सिरमौर जिल्ह्यात धिरैना नावाच्या गावात झाला. त्याच्या वडिलांचं नाव ज्वाला राम असं आहे. त्याच्या आईचं नाव तांडी देवी असं आहे.

(हेही वाचा-शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल )

खलीचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. खलीला सहा भावंडे होती. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी खलीला दगड फोडण्याचं काम करावं लागलं. त्याला ॲक्रोमेगाली नावाचा आजार आहे. या आजारामुळे माणसाच्या शरीरामध्ये उंची आणि बांधा वाढवणाऱ्या हार्मोन्सची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे शरीरातल्या हाडांचा आकारही वाढतो. परिणामी हात, पाय आणि चेहऱ्याची हाडे सामान्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायला लागतात. (The Great Khali)

खलीने सिक्युरिटी गार्ड म्हणूनही काम केलं आहे. प्रोफेशनल कुस्तीगीर म्हणून आपली कारकीर्द सुरू करण्याआधी खली पंजाब पोलिस दलामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून काम करत होता. खली ज्यावेळी हिमाचल प्रदेशातल्या शिमला येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता, त्यावेळी पंजाबमधल्या एका पोलिस अधिकाऱ्याने खलीला १९९३ साली पंजाब पोलिस दलात सामील करून घेतलं. (The Great Khali)

(हेही वाचा- Uddhav Thackeray: ठाकरेंना दणका मिळणार? उबाठाचा आमदार भाजपच्या वाटेवर, चर्चांना उधाण)

दलीप सिंह राणा हा WWE चॅम्पियनशीपमध्ये द ग्रेट खली या नावाने ओळखला जातो. त्याने २००० साली प्रोफेशनल कुस्ती खेळायला सुरुवात केली. याव्यतिरिक्त खलीने चार हॉलिवूड चित्रपट, दोन बॉलीवूड चित्रपट तसंच अनेक टेलिव्हिजन शोजमध्येही काम केलेलं आहे. (The Great Khali)

ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०११ या काळामध्ये खली टेलिव्हिजन रिॲलिटी शो बिग बॉसमध्येही दिसला होता. त्या शोमध्ये तो प्रथम उपविजेता म्हणून निवडून आला होता. त्यावेळी बिग बॉसने खलीसाठी खास व्यवस्था केली होती. जसे की, त्याला वापण्यासाठी त्याच्या साईझचा बेड बनवून घेतला होता. तसंच मार्च २०११ साली, खलीने NBC च्या आउटसोर्सच्या १८व्या भागामध्ये एक छोटासा कॅमिओ केला होता आणि डिस्ने चॅनलवरच्या पेअर ऑफ किंग्स नावाच्या टीव्ही सिरीयलच्या “फाईट स्कूल” या भागामध्ये खली ॲटोग-रॉक-स्मॅशिंग जायंट म्हणून दिसला होता. (The Great Khali)

(हेही वाचा- ST Booking Ganesh Chaturthi : गणेशोत्सवासाठी एसटीने प्रवास करणार आहात ?; बसेस होऊ लागल्या फुल्ल)

दीलीप सिंह राणा याचं लग्न २७ फेब्रुवारी २००२ साली हरमिंदर कौर हिच्याशी झालं. त्यांच्या लग्नानंतर लवकरच दलीप सिंहच्या कुस्तीच्या कारकिर्दीलाही मोठी चालना मिळाली. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांनी त्याने द ग्रेट खली नावाने WWE मध्ये पदार्पण केलं. फेब्रुवारी २०१४ साली द ग्रेट खली आणि त्याची पत्नी हरमिंदर कौर यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आणि तिच्या आगमनाने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्यांनी आपल्या मुलीचं नाव अवलीन राणा असं ठेवलं.
२०२३ साली खलीच्या पत्नीने अमेरिकेत एका मुलाला जन्म दिला. (The Great Khali)

खली अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा आहे. तो दररोज ध्यानधारणा करतो. तसंच दारू आणि तंबाखूपासून दूर राहतो. भारतीय आध्यात्मिक गुरू आशुतोष महाराज यांचा तो शिष्य आहे. खलीला शाकाहारी जेवण आवडतं पण तो मांसाहारही करतो. खलीला पिट्यूटरी ग्रंथीवर ट्यूमर झाला होता. त्यामुळे खलीवर २६ जुलै २०१२ रोजी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (The Great Khali)

(हेही वाचा- सणासुदीच्या पार्श्वभूमीवरच CM Eknath Shinde मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावर! अधिकारी लागले कामाला)

खलीने २० फेब्रुवारी २०१४ साली अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. फेब्रुवारी २०१५ साली खलीने पंजाबमध्ये स्वतःचं कॉन्टिनेंटल रेसलिंग एंटरटेनमेंट नावाचं कुस्तीचं ट्रेनिंग स्कूल सुरू केलं. या स्कूलतर्फे त्याने १२ डिसेंबर २०१५ साली कुस्तीचा पहिला कार्यक्रम आयोजित केला होता. पुढे फेब्रुवारी २०१६ साली खलीने CWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२२ साली त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (The Great Khali)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.