सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) जन्म ८ जुलै १९७२ साली कलकत्ता येथे झाला. त्याच्या वडिलांचं नाव चंडीदास गांगुली आणि आईचं नाव निरुपा गांगुली असं होतं. त्याच्या वडिलांची एक प्रिंटिंग प्रेस होती. ते कलकत्त्यातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. सौरव गांगुलीचे बालपण वैभवात गेले. त्याला लाडाने सगळे महाराजा असं म्हणायचे. सुरुवातीला सौरव फुटबॉल खेळायचा. शाळेत असताना सौरव शाळेच्या क्रिकेट टीममध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळायचा. तो सध्या वनडे क्रिकेट मॅचमध्ये सर्वात जास्त म्हणजे १०,००० धावा करणारा ५वा आणि भारतातून सचिन तेंडुलकरच्या नंतरचा २रा खेळाडू आहे. (Sourav Ganguly)
कित्येक प्रादेशिक स्पर्धांमध्ये जसे की, रणजी करंडक, दलीप करंडक इत्यादी स्पर्धांमध्ये चांगली खेळी खेळल्यानंतर सौरव गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट संघात इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत १३१ धावा करून त्याने संघात आपलं स्थान पक्कं केलं. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सतत चांगली खेळी खेळली आणि अनेक वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे भारतीय संघातलं त्याचं स्थान निश्चित झालं. १९९९ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीने राहुल द्रविडसोबत ३१८ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी आजही विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातली सर्वोच्च भागीदारी मानली जाते. (Sourav Ganguly)
(हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित लोकांच्या मनातील कर्णधार,’ – सुनील गावसकर)
२००० साली भारतीय क्रिकेट संघातल्या तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकर याच्या स्वास्थ्य तक्रारींमुळे आणि काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंग प्रकरणात समावेश होता असं आढळून आल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. परिणामी सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) कर्णधार बनवण्यात आलं. काऊंटी क्रिकेटमधल्या डरहमच्या खराब कामगिरीबद्दल आणि २००२ साली नॅटवेस्टच्या फायनल मॅचमध्ये शर्ट काढल्याबद्दल गांगुलीला प्रसार माध्यमांद्वारे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. पण सौरभ एक आक्रमक कर्णधार म्हणून समोर आला. (Sourav Ganguly)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community