बायचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) हा एक भारतीय माजी व्यावसायिक फुटबॉलपटू आहे, तो स्ट्रायकर होता. भुतियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉलला ओळख निर्माण करुन दिली. फुटबॉलमधील शूटिंग कौशल्यामुळे त्याला सिक्कीमी स्निपर असे टोपणनाव दिले गेले.
तीन वेळा भारतातील प्लेयर ऑफ द इयर ठरलेले आय. एम. विजयन यांनी भुतियाचे वर्णन “भारतीय फुटबॉलला देवाची देणगी” असे केले होते. बायचुंग भुतियाचा (Bhaichung Bhutia) जन्म १५ डिसेंबर १९७६ रोजी झाला. चल तर भुतियाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…
(हेही वाचा – Borivali Skywalk : बोरिवलीतील स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी?)
क्लब करिअर
ईस्ट बंगाल एफसी :
भुतियाचे ईस्ट बंगाल एफसीमध्ये अनेक स्पेल्स होते, जिथे त्याने त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली.
जेसीटी मिल्स :
तो जेसीटी मिल्सकडून खेळला आहे, त्याच्या कार्यकाळात लीग जिंकली आहे.
ब्युरी एफसी :
१९९९ मध्ये ब्युरी एफसीमध्ये सामील झाल्यावर युरोपियन क्लबच्या करारावर स्वाक्षरी करणारा तो पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला.
(हेही वाचा – Delhi मध्ये वाढते रोहिंग्यांची संख्या; सुरक्षेसाठी बनलाय धोका; विधानसभा निवडणुकीत गाजणार मुद्दा)
आंतरराष्ट्रीय करिअर :-
भारत राष्ट्रीय संघ :
भुतियाने (Bhaichung Bhutia) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, त्याने ८४ कॅप्स मिळवल्या आणि २७ गोल केले.
पुरस्कार :
नेहरू कप, एलजी कप, SAFF चॅम्पियनशिप तीन वेळा आणि AFC चॅलेंज कप पटकावले आहेत.
कर्णधारपद :
भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी पाहिली आहे.
रिॲलिटी शो :
२०१२ मध्ये रिॲलिटी टीव्ही शो “झलक दिखला जा” जिंकला होता.
ऑलिम्पिक टॉर्च रिले :
तिबेटच्या स्वातंत्र्य चळवळीच्या समर्थनार्थ ऑलिम्पिक टॉर्च रिलेवर बहिष्कार टाकणारा पहिला भारतीय खेळाडू.
बायचुंग भुतिया फुटबॉल स्कूल्स :
फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीत फुटबॉल स्कूलला स्थापना केली.
(हेही वाचा – काँग्रेसच्या तोंडाला संविधान बदलण्याचे रक्त असे लागले की…; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल)
सन्मान आणि पुरस्कार :-
अर्जुन पुरस्कार :
१९९६ मध्ये फुटबॉलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जून पुरस्कार प्राप्त झाला.
पद्मश्री :
२००८ मध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community