‘या’ बॅंकांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे, दंड म्हणून कापली जाणारी रक्कम वाचवा

बचत खात्यावर बॅंक सेवा-सुविधा देतात. तर कमीत कमी बॅलन्सचा नियमही लागू करतात. खात्यात ठराविक रक्कम ठेवावी लागते. त्यासाठी बॅंका बचत खात्याला मर्यादा घालून देतात. म्हणजेच प्रत्येक बॅंक एक ठराविक मर्यादा निश्चित करते. तेवढी रक्कम त्या खात्यात ठेवावी लागते. जर ही मर्यादा पाळली नाही आणि रक्कम मर्यादेच्या खाली आली तर खातेदाराला दंड द्यावा लागतो. SBI, HDFC, ICICI बॅंकासाठी कमीतकमी किती रक्कम ठेवावी लागते ते पाहूया.

SBI खातेदारांना किती रक्कम ठेवणे आवश्यक

State bank of Indiaच्या बचत खात्यात किती शिल्लक रक्कम ठेवायची हे विभागावर ठरते. म्हणजे ग्रामीण क्षेत्रासाठी शिल्लक रक्कमेची मर्यादा 1 हजार रुपये आहे. तर निन्मशहरांतील ग्राहकांना 2 हजार रपुये खात्यात ठेवावे लागतात. तर मेट्रो शहरातील ग्राहकांना खात्यात कमीतकमी 3 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे.

HDFC Bank चा नियम काय सांगतो? 

खासगी क्षेत्रातील या मोठ्या बॅंकेसाठी कमीत कमी किती बॅलन्स ठेवावे लागते हे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणावरुन ठरते. मोठ्या शहरात राहत असाल तर खात्यात कमीत कमी 10 हजार रुपये बॅलन्स ठेवावे लागेल. निन्म शहरांसाठी 5 हजार रुपये आणि ग्रामीण भागातील शाखांसाठी 2 हजार 500 रुपये बॅलन्स ठेवावे लागेल.

( हेही वाचा: १ ऑक्टोबरपासून राजभवन सर्वसामान्यांसाठी खुले )

ICICI Bank मध्ये एवढी मर्यादा

ICICI Bank मध्ये एचडीएफसी बॅंकेप्रमाणेच खात्यातील रक्कमेचा नियम आहे. शहरी भागासाठी 10 हजार रुपये, निन्म शहरी भागासाठी 5 हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी 2 हजार 500 रुपये बॅलन्स ठेवावे लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here