ऋजुता लुकतुके
डिसेंबर महिन्यातही देशातील सणासुदीचा मूड सुरूच आहे. कारण, लोकांना आता नववर्षाचे वेध लागले आहेत. अशावेळी प्रिमिअम कार कंपन्यांनी आपल्या नवीन पिढीच्या कार बाजारात आणण्याचा सपाटा लावला आहे. यातच लेक्सस कंपनीची एलएम २०२३ ही कार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एप्रिल महिन्यात एका जागतिक ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने लोकांसमोर ही कार पहिल्यांदा आणली होती. आणि आता भारतातही २ डिसेंबरपासून गाडीचं बुकिंग सुरू झालं आहे.
(हेही पहा-Indralal roy : पहिला भारतीय फायटर पायलट, ज्याने १९ व्या वर्षी पाडले ९ जेट)
लेक्ससची ही नवीन कार कशी आहे, फिचर्स काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तिची किंमत काय आहे पाहूया…
Insert tweet –
The new Lexus LM is coming to India. Lexus has shared a first set of teasers ahead of its upcoming launch.
Here’s what you can expect: https://t.co/gJY3PUjfWT
— Autocar India (@autocarindiamag) August 22, 2023
लेक्सस प्रिमिअम कारची नवीन पिढीची व्हॅन म्हणून लेक्सस एलएम २०२३ कडे बघितलं जात आहे. ३४५६ सीसी इतकी प्रचंड इंजिन क्षमतेची ही गाडी आहे. आणि आणि पेट्रोलवर चालणाऱ्या या गाडीचं ट्रान्समिशन ऑटोमेटिक असेल. पाच सीटर ही गाडी चार रंगांमध्ये उपलब्ध असेलगाडीची किंमत एक कोटी २० लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीची स्पर्झा मर्सिडिझ बेंझ एएमजी सी४३, आऊडी आरएस५, मर्सिडिझ बेंझ एएमजी ई५३ या गाड्यांशी असेल.
(हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=RnH3Aa0mmCI)
Join Our WhatsApp Community