-
ऋजुता लुकतुके
लेक्सस हा जपानी ब्रँड असला तरी अमेरिकेत तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण, त्यांनी या बाजारपेठेत सातत्याने एसयुव्ही गाड्या आणल्या आहेत. प्रिमिअम उत्पादन देऊन तरुणांना खुश केलं आहे. तिथून आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या जमान्यात लेक्ससनेही आपले गिअर बदलले आहेत. कंपनीचा पुढील टप्पा आहे तो ईव्ही कार बनवण्याचा. लेक्सस युएक्स ही कंपनीची तरुणांना आवडेल अशीच क्रॉसओव्हर एसयुव्ही गाडी आहे. (Lexus UX)
(हेही वाचा- Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत वाहतुकीत बदल)
प्रिमिअम एसयुव्ही गाड्यांची ज्यांना हौस आहे अशा लोकांसाठी लेक्ससने आपली नवीन लक्झरी कार लेक्सस युएक्स बाजारात आणण्याची तयारी चालवली आहे. भारतात कंपनी नवीन पिढीच्या ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचंच पाऊल म्हणून ही हायब्रीड कार भारतात आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. पेट्रोल इंधनावर चालणारी या कारचं इंजिन १९८७ सीसी क्षमतेचं आहे. या गाडीत ४ सिलिंडर असून ती पूर्णपणे ऑटोमेटिक कार आहे. गाडीत एकावेळी ५ लोक बसू शकतील. (Lexus UX)
तर हायब्रीड मॉडेल हे ३०० एच लिथिअम बॅटरीयुक्त असेल. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याबरोबरच वीजेचा वापरही ८ टक्क्यांनी कमी होणार आहे. (Lexus UX)
विशेष म्हणजे या गाडीची भारतातील किंमत अंदाजे ४० लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. म्हणजेच इतर महाग लेक्सस कारच्या तुलनेत हा परवडणारा पर्याय कंपनीने समोर ठेवला आहे. (Lexus UX)
(हेही वाचा- नोव्हेंबरच्या कोणत्या दिवशी होणार निवडणुका ? CM Eknath Shinde यांनी दिला जागा वाटपावर अपडेट!)
सुरुवातीला ही कार कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण, सध्या कंपनीने युएक्स कार ही पेट्रोल इंधनाच्या व्हरायटीमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक्ससची पहिली इलेक्ट्रिक कार ही युएक्स ३०० ई ही असेल. (Lexus UX)
2025 Lexus UX 300h Review: A Prius for people who don’t want a Prius. https://t.co/xjwQVftEE2 pic.twitter.com/NGtB7GN3xa
— Road & Track (@RoadandTrack) September 12, 2024
लेक्सस कार आपल्या देखण्या एक्टिरिअरसाठी प्रसिद्ध आहे. ही कारही त्याला अपवाद नसेल. बाहेरून स्टायलिश आणि आधुनिक दिसणारी ही गाडी आतूनही प्रशस्त आहे. गाडीला प्रभावी एलईडी हेडलँप देण्यात आले आहेत. तर गाडीची लांबी इतर गाड्यांपेक्षा १३ मीटर लांब आहे. (Lexus UX)
(हेही वाचा- देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता – Nitin Gadkari)
ही गाडी आतूनही प्रशस्त आहे. तिचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले १० इंच मोठा आहे. गाडी चालवण्याचा तुमचा अनुभव मात्र भन्नाट असेल असा कंपनीचा दावा आहे. कारण, शून्य ते १०० किमी ताशी इतका पल्ला गाठण्यासाठी कंपनी फक्त ०.७५ सेकंदं इतका वेळ घेते. (Lexus UX)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community