ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि अमर्याद भविष्यातील दरी ही सांधतात. ग्रंथालयांच्या विकासाला प्राधान्य देऊन, ग्रंथालये हा विकासाप्रती मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग म्हणून, तसेच ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.
राजधानीतील प्रगती मैदानामधील हॉल क्रमांक ५ येथे ५ व ६ ऑगस्ट २०२३ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथालय महोत्सव २०२३’ चे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजन करण्यात येणार आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत नवी दिल्ली येथे “ग्रंथालय महोत्सव” च्या वेळापत्रकाचे बुधवारी अनावरण केले. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव मुग्धा सिन्हा यावेळी उपस्थित होते.
(हेही वाचा – Muslim : शनी मंदिरातला पुजारी निघाला गुल्लू खान; पोलिसांनी केली अटक)
उपराष्ट्रपती जगदीप धनखड या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहतील. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनाच्या वापर करुन, नव्या पीढीची मानसिकता ओळखून, त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचविणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. यामुळे भावी पीढीमध्ये वाचनसंस्कृती वाढेल तसेच वाचनचळवळीला खरी गतीमानताही प्राप्त होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community