ऋजुता लुकतुके
आयुर्विमा महामंडळ अर्थात, एलआयसी कंपनीने १४ सप्टेंबर रोजी केंद्रसरकारला १,८३१ कोटी रुपयांचा धनादेश लाभांशापोटी केंद्रसरकारला देऊ केला. कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहांती यांनी वित्त सेवांचे अतिरिक्त सचिव एम पी तंगिराला यांच्या उपस्थितीत हा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपवला.
एलआयसी (LIC Dividend) कंपनीने २८ ऑगस्टला घेतलेल्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा लाभांश मंजूर केला होता. कंपनीचं हे ६७वं वर्ष आहे. १९५६ साली ५ कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू करण्यात आलेल्या या कंपनीचं मूल्य मार्च २०२३ पर्यंत ४५.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तसंच कंपनीकडे ४०.८१ लाख कोटी रुपयांचा आयुर्विमा आहे.
Smt @nsitharaman receives a dividend cheque of Rs 1,831.08 crore for FY 2022-23 from Shri Siddhartha Mohanty – Chairman of Life Insurance Corporation of India (@LICIndiaForever). pic.twitter.com/Rsx8DRZlhf
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) September 14, 2023
दोन दशकांपूर्वी देशातील विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं. पण, तरीही आयुर्विमा क्षेत्रात एलआयसी (LIC Dividend) ही सरकारी कंपनी अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२० साली एलआयसी कंपनीची नोंदणी शेअर बाजारातही झाली आहे.
Join Our WhatsApp Community