पोलीस आयुक्तांची स्वाक्षरी करून तयार केला सुरक्षा एजन्सीचा परवाना, एकाला अटक

114

सुरक्षा एजन्सी चालविण्याकरीता पोलीस आयुक्तांची खोटी स्वाक्षरी करून बनावट परवाना बनविल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका सुरक्षा रक्षक एजन्सीच्या मालकाला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध फसवणूक, बोगस दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवम पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

शिवम लालसाहेब पांडे असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा एजन्सी मालकाचे नाव आहे. पांडे हा ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी स्वाक्षरी करून बनावट परवानाच्या आधारे मागील काही वर्षांपासून ठाण्यात सुरक्षा रक्षक एजन्सी चालवत होता. चितळसर मानपाडा पोलिसांनी सोमवारी पांडे यांच्या सुरक्षा रक्षक एजन्सीच्या कार्यालयावर छापा टाकून पांडे यांच्याकडे सुरक्षा रक्षक एजन्सीच्या परवानाची मागणी केली. त्याने पोलिसांना त्याच्या जवळ असणारा परवाना दाखवला, त्यात २२ फेब्रुवारी २०२२ ते २६ फेब्रुवारी २०२७ या तारखेपर्यत वैधता होती.

पोलिसांना परवानाबाबत संशय येताच त्यांनी तो परवाना तपासला असता तो बनावट असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पांडे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने कबुली देत इंटरनेट वरून परवाना डाउनलोड करून त्यात खाडाखोड करून तो त्याच्या कंपनीचे नाव टाकून ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची स्वाक्षरी करून ठाणे पोलीस विभागाचा शिक्का मारून तो तयार केल्याची कबुली दिली. चितळसर पोलिसांनी शिवम पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.