मुंबईतील एवढ्या वाहनचालकांचे परवाने होणार रद्द

मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात आतापर्यंत ६६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारण्यास सुरुवात केली होती. यानंतर आता विना हेल्मेट तसेच विरूद्ध दिशेने वाहन चालवणे या दोन्ही नियमांचा भंग करणाऱ्या २२ हजार ८२८ वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याची शिफारस मुंबई पोलिसांनी केली आहे. लवकरच या वाहनचालकांचा परवाना रद्द होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)

वाहनचालकांचे परवाने होणार रद्द

मुंबईत विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे बहुतांश अपघात होतात. अशा चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ६६ हजार २१३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ५ हजार ९८७ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यासाठी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी प्रमुख समस्या म्हणजे भंगार गाड्या, अशा भंगार गाड्यांवर कारवाई करत रस्त्यावरून १४ हजार ३५३ भंगार वाहने हटवण्यात आली आहेत आणि उर्वरित विरूद्ध दिशेने वाहन चावणाऱ्या २२ हजार ८२८ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये रिमूव्ह खटारा, विरूद्ध दिशेने वाहन चालवण्यांवर कारवाई, विनाकारण हॉर्न वाजवू नये यांसारख्या मोहिमांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here