मुंबईतील मालाड पश्चिमेला असणाऱ्या अक्सा बीचवर संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथून फिरण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील १२ लोक समुद्राला आलेल्या भरतीमध्ये बुडत होते. मात्र या बीचवर सतर्क आणि तैनात असलेल्या मुंबई महापालिकेच्या लाईफ गार्डच्या टीमने त्याना सुखरूप बचावल्याचे समोर आले आहे.
१२ जणांना सुखरूपपणे बचावले
मुंबई महापालिकेचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांच्या सहा जणांच्या टीमने या सर्वांना बचावले आणि सुखरूप किनाऱ्यावर आणून सोडले. समुद्रात लोक बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच लाईफ गार्डनी समुद्रात उडी घेतली आणि बुडत असलेल्या १२ जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. मुंबई महापालिकेच्या लाईफ गार्डच्या टीमने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
(हेही वाचा – BMC: आशीष शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा भार स्वीकारला )
Join Our WhatsApp Community