दक्षिण अमेरिकेतील वेनेजुईला नावाच्या एका देशामध्ये मॅराकाईबो नावाचे मोठे सरोवर आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार हे सरोवर जगातल्या सर्वांत प्राचीन काळातील सरोवरांपैकी एक आहे. हे सरोवर जवळजवळ पस्तीस मिलियन वर्षे जुने असावे. इतर सरोवरांच्या तुलनेने हे सरोवर खूप मोठे आहे. याचे क्षेत्रफळ जवळजवळ तेरा हजार वर्ग किलोमीटर इतके आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की लाखो वर्षांमध्ये या सरोवराच्या पाण्यात तसेच तळभागात अनेक बदल झालेले असतील त्यामुळे हे सरोवर जगातील सर्वात जास्त विजा चमकणारे ठिकाण बनले आहे. पण अद्यापही या गोष्टीचे पक्के पुरावे सापडलेले नाहीत.
या विजा चमकण्यामागे अनेक कारणे आहेत असे म्हणतात. या सरोवराच्या दक्षिणेला अँडीज पर्वत आहे तर उत्तरेला कॅरेबियन महासागर आहे. पर्वतावरून वाहणारे थंडगार वारे आणि समुद्रावरून वाहणारे दमट वारे याचे घर्षण झाल्याने विजा चमकतात असे काही वैज्ञानिकांचे मत आहे. तर काही वैज्ञानिक हे मत नाकारत आहेत. त्याचे असे म्हणणे आहे की, लाखो वर्षांपासून या सरोवराच्या तळाशी मिथेन गॅस साठला आहे. हा गॅस वर येऊन वातावरणात मिसळला की विजा चमकतात. या सरोवराच्या भवताली सतत विजा चमकण्याचे नक्की काय कारण आहे ते जाणून घेण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येत आहे. पण अद्याप कोणतेही समाधान मिळू शकले नाही.
(हेही वाचा – मिशन २०२४ : ४५० जागांवर विरोधकांचा ‘वन इज टू वन’ फॉर्म्युला)
अमेरिकन मेटोरॉलॉजीच्या साल 2016 च्या सर्व्हेनुसार या सरोवराजवळ वर्षातले 297 दिवस वीज चमकतात. या विजा एका मिनिटात पंचवीस ते चाळीस वेळाही चमकतात. बहुतेक वेळेस त्या विजांची तीव्रता इतकी असते की या विजांच्या उजेडात इथले विद्यार्थी रात्रीही अभ्यास करू शकतात.
या सरोवराविषयी सोळाव्या शतकामध्ये एका अमेरिको वेपस्की नावाच्या स्पॅनिश नाविकाने शोध लावला होता. पण इथल्या स्थानिक लोकांना आधीपासूनच याबद्दल माहिती होती. त्यांना या विजा वैगरे चमकणे हा सगळा भुताटकीच्या गोष्टी वाटायच्या. या सरोवराजवळ कोणीही राहायला धजावायचे नाही.
त्यानंतर जगभरातील विविध चित्रविचित्र गोष्टी आवडणाऱ्या पर्यटकांसाठी हे सरोवर एक चांगले पर्यटनस्थळ बनले. तेव्हा कुठे हळूहळू तीनशे वर्षांनंतर या सरोवराजवळ लोक येऊन पुन्हा राहायला लागले. इथे येणाऱ्या पर्यटकांमुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात या सरोवराजवळ दिवसभर आणि रात्रभर विजा चमकत असतात . इथे राहून पर्यटक या विजांचा अनुभव घेतात. बऱ्याचदा या विजा खालीसुद्धा कोसळतात. अशावेळी पर्यटक आणि इथल्या स्थानिक लोकांना खूप काळजी घ्यावी लागते. तरीही कधीतरी काही दुर्घटना घडतेच.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community