राज्यात ओमायक्रॉनचा आक़डा ८८ पर्यंत पोहोचल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळच्या जंगी सेलिब्रेशनला आता घाला घातला जाण्याची दाट शक्यता आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला लोकांची गर्दी अजिबात होता कामा नये, या दिवसांत कडक निर्बंध हवेत, अशी सूचना राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्सचे डॉ राहुल पंडित यांनी केली आहे.
सलग दुस-या दिवशी कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर
शुक्रवारी सलग दुस-या दिवशी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वाढत्या रुग्णसंख्येमुळे निदर्शनास येत आहे. गुरुवारी राज्यभरात १ हजार २०२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर शुक्रवारी १ हजार १७१ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नोंदवला गेला. या दोन दिवसांत दिवसभरात उपचारांतून बरे होणा-या रुग्णांच्या आकडेवारीत घट नोंदवली गेली. गुरुवारी ९५३ रुग्णांना कोरोनाच्या उपचारातून यशस्वी बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. शुक्रवारी ६१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
(हेही वाचा –व्हीआयपी सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता महिला करणार..)
रुग्णांना वाचवण्यात आरोग्य विभागाला अपयश
सध्या राज्यात ७६ हजार ३७३ व्यक्ती घरी विलगीकरणात तर ८९९ रुग्ण व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर कोरोनावर ७ हजार ८१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी राज्यात १७ कोरोनाबाधित रुग्णांना वाचवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले.
Join Our WhatsApp Community