शिवजयंतीनिमित्त ड्राय डे! कधी आणि कुठे?

118

लातूर जिल्ह्यात 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरा होत असल्याने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.लातूर यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत:बंद राहतील, असे आदेशित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीवर निलंबीत अथवा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

तर नांदेडमध्ये शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी. राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व सर्व सामान्य नागरीकांचे हित लक्षात घेवून शनिवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी निर्गमीत केली आहे.

या ठिकाणी वाहतूक बंद

वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आय.टी .आय चौकापर्यत जाण्या-येण्यास बंद, राज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नर, वर्कशॉप टी पॉईट, श्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद, बर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंद, सिडको/ हडको ते जुना मोंढयाकडे येण्यासाठी बंद असणार आहे.

(हेही वाचा – शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल!)

वाहतूकी करीता पर्यायी मार्ग- बर्की चौकाकडून जुना मोंढयाकडे येणारी वाहतूक महम्मंद अली (गणेश टॉकीज) रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील, वजीराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील, राज कार्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कार्नर, वर्कशॉप कार्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागाजुर्ना टी पॉईट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्री निवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील, गोवर्धन घाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील, सिडको/हडको कडून येणारी वाहतूक साई कमान, गोवर्धन घाट नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.