ऐकावं ते नवलंच! पीपीई किट घालून त्यानं केली देशीदारू दुकानात चोरी

96

मेळघाटच्या धारणी तालुक्यात चोरीच्या विविध घटनांची मालिका सुरूच आहे. त्यातच एका चोरट्याने चक्क पीपीई किट घालून एका दारूच्या दुकानात चोरी केल्याची धक्कादायक घटना येथे उजेडात आली.

असा घडला प्रकार

कलमखार येथील देशीदारू दुकानात हा चोरटा मध्यरात्री शिरला. त्याने सीसीटीव्हीचे डिव्हिआर, एलसीडी व रोख रक्कम लंपास केली. दुकानात चोरी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला गेला. दुकानाचे मालक विशाल मालवीय व दुकानाचे मॅनेजर यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज येत असल्याने त्यावरून या चोरीचा सुगावा लागला. दुकानात शिरलेल्या चोरट्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी चोरट्यांनी आता नवी शक्कल लढविल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात अशा स्वरूपाच्या आयडिया लढविण्यात येत असताना आता ग्रामीण भागातसुद्धा चोरटे विविध शक्कल लढवून दुकाने फोडत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे युवराज पेंग्विन, तर शेलार आणि भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायच का? )

या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. चोरट्याने ४० हजार रुपये नगदी, सुमारे ३० हजार रुपयांचा एसलीडी व डिव्हिआर, असा अंदाजे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. संपूर्ण पांढऱ्या रंगाची पीपीई किट व मास्क घातलेला दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.