जगभरात पुरातन वास्तूंचा शोध घेऊन त्या जगासमोर आणण्याचे काम युनेस्को करत असते. म्हणून युनाईटेड नेशन्स एज्युकेशन, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनचे जगभरात महत्व आहे. दरवर्षी हे संस्था जगभरातील नव्याने दृष्टीक्षेपात आलेल्या पुरातन वास्तूंचा शोध घेते आणि त्यांनी यादी प्रसिद्ध करत असते. यामुळे संबंधित देशातील पर्यटन व्यवसायाला विशेष चालना मिळत असते. मात्र दुर्दैवाने या संस्थेकडून भारताला जाणीवपूर्वक कमी महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
#WorldHeritageDay| Which countries have the highest number of #WorldHeritage sites pic.twitter.com/yP6jTC4N6i
— News18 Graphics (@News18Graphics) April 18, 2022
युनेस्कोने जगभरातील पुरातन वास्तूंचा शोध घेत वर्ष २०२२ ची यादी जाहीर केली, त्यामध्ये भारतातील अवघ्या ४० वास्तूंचा समावेश केला आहे. यात ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्र स्वरूपातील ठिकाण आहे. तर सर्वाधिक इटलीमध्ये ५८ पुरातन वास्तू असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये ५६, जर्मनी ५१, फ्रांस आणि स्पेन या दोन्ही देशांत ४९ पुरातन वास्तू असल्याचे यात म्हटले आहे. युनेस्को जागतिक पुरातन समितीची चीनमध्ये ४४वी बैठक पार पडली. या बैठकीत भारतातील तेलंगणा आणि गुजरात येथील २ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा तिसऱ्या आघाडीचा २०१९मध्ये फसलेला प्रयोग २०२४ला पुन्हा होणार!
५ हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या भारताकडे दुर्लक्ष
भारतातील सांस्कृतिक इतिहासाला धार्मिकी, आध्यात्मिक अधिष्ठान आहे. म्हणून भारताचा सांस्कृतिक वारसा हा हिंदू धर्माशी निगडित आहे. या हिंदू धर्माचा इतिहास ५ हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे या इतिहासाचे जीवंत साक्षीदार असलेल्या शेकडो वास्तू भारतात अस्तित्वात आहेत. परंतु दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणीवपूर्वक भारताच्या या वैभवाकडे दुर्लक्ष करत २ ते अडीच हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या पाश्चिमात्य देशांमध्ये युनेस्कोला सर्वाधिक पुरातन वास्तू आढळून येत आहेत. यावरून युनेस्कोचा दुजाभाव, भारतद्वेष प्रकर्षाने दिसून येते आहे.
Join Our WhatsApp Community