मार्च महिना आला की आर्थिक व्यवहारांना गती येते. करांचा भरणा असताे, बँकांची वसुली असते. त्यासाठी साऱ्यांचीच धांदल हाेते. अशा धांदलीच्या मार्च महिन्यात बँकांना आठ सुट्या आल्या आहेत. त्याची सुरुवातच एक तारखेपासून हाेत आहे.
एकूण ८ दिवस बँका बंद
महाशिवरात्रची सुटी घेऊन बँका दाेन मार्चला उघडतील. चार दिवसांच्या सेवेनंतर रविवारची सुटी लागेल. त्याच्या पुढे चार रविवार, दाेन शनिवार मिळून सहा दिवस. महाशिवरात्र व धुलिवंदन असे दाेन दिवस मिळून एकूण ८ दिवस बँका बंद राहतील.
(हेही वाचा – “मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर… “, भाजपने दिला इशारा)
३१ मार्चला आर्थिक वर्षाची समाप्ती
३१ मार्च हा ‘क्लाेजिंग डे’ असणार म्हणजेच आर्थिक वर्षाची समाप्ती हाेईल. या दिवशी शासकीय कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बँका ग्राहक सेवा देणार आहेत. ग्राहकांनी शक्यताे पहिल्याच पंधरवड्यात बँकेची कामे करून घ्यावीत. गर्दीत थांबण्यापेक्षा इ-बँकिंग प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलेय.
अशा आहेत मार्चमधील सुट्या
- १ मार्च : महाशिवरात्री,
- ६ मार्च : रविवार सुटी,
- १२ मार्च : दुसरा शनिवार,
- १३ मार्च : रविवार सुटी,
- १८ मार्च : धुलिवंदन ,
- २० मार्च : रविवार सुटी,
- २६ मार्च : चाैथा शनिवार,
- २७ मार्च : रविवार सुटी