ब्लॉक कॉलर म्हणजे काय…वाचा…

122

मुंबई पोलिसांचा हेल्पलाईन क्रमांक म्हणून १०० नंबर आहे. कोणी अडचणीत असेल, कुठे भांडण होत असेल किंवा काही संशयास्पद असल्यास अथवा कुणाला मदत हवी असल्यास १०० क्रमांकावर फोन केल्यावर संबंधित व्यक्तीला तात्काळ मदत उपलब्ध होते.

पोलिसांना विनाकारण त्रास देणे 

मात्र अनेक जण या क्रमांकावर विनाकारण फोन करून नाहक त्रास देत असतात. अनेक वेळा तर काही जण फोन करून काही नाही फोन लागतो का म्हणून फोन केला होता, अशी कारणे देतात, तर काही जण पोलिसांवर राग काढण्यासाठी जाणून बुजून फोन करून त्रास देण्याचे काम करतात. तर काही जणांकडून वारंवार फोन करून विनाकारण पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी, अंमलदार यांना त्रास देण्याचे काम करीत असतात. विनाकारण फोन करून त्रास देणाऱ्या कॉलरचा क्रमांक ब्लॉक केला जातो आणि तो क्रमांक ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला जातो.

( हेही वाचा : #Worldwar3 रशिया-युक्रेनमध्ये ‘जंग’…नेटकऱ्यांना चढलाय भलताच ‘रंग’! )

ब्लॉक कॉलर लिस्ट

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दररोज १०० क्रमांकावर शेकडो कॉल केवळ त्रास देण्यासाठी येत असतात, कॉल करणारे नको ते प्रश्न विचारून पोलिसांना हैराण करीत असतात, तर अनेक जण अफवा पसरविण्याचे काम या क्रमांकावर करीत असतात, अशा वेळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून येणाऱ्या कॉलची माहिती काढली जाते व त्याची यादी तयार केली जाते. त्यापैकी ब्लॉक लिस्टची एक यादी तयार केलेली आहे. एकाच क्रमांकावरून केवळ त्रास देण्याच्या हेतूने करण्यात येणाऱ्या कॉलला ब्लॉक कॉलरमध्ये टाकले जाते किंवा त्याचा तो क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकला जातो. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ब्लॉक लिस्ट यादीत अंदाजे १०० पेक्षा अधिक क्रमांक ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात आलेले आहे. त्यात अनेक महिला, अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.