साहित्यिक, वकील, पत्रकार, राजकारणी बहुआयामी Khushwant Singh

247
भारतीय साहित्याच्या माळेतील अनेक मौल्यवान मण्यांपैकी एका मण्याचे नाव आहे खुशवंत सिंह (Khushwant Singh). खुशवंत सिंह यांची लेखणी आजच्या आधुनिक काळातही सुसंगत वाटते. आपल्या कविता आणि साहित्याच्या जोरावर खुशवंत सिंह यांनी भारतीय साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान मिळवले. खुशवंत सिंह यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ साली पंजाब येथील हदाली नावाच्या गावात झाला. फाळणीनंतर आता हे गाव पाकिस्तानमध्ये आहे. खुशवंत सिंह यांच्या वडिलांचे नाव सोभा सिंह असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव कवल मलिक.
खुशवंत सिंह (Khushwant Singh) यांनी मॉर्डन स्कुल येथून मॅट्रिक तसेच सेंट स्टीफन येथून इंटरमीडिएट पास केले. त्यानंतर त्यांनी लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून स्नातक पदवी प्राप्त केली. मग त्यांनी पुढे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी लंडन येथील किंग्ज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मग १९३९ साली वकिलीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते लाहोरला येऊन तेथील हायकोर्टात आपली प्रॅक्टिस करू लागले.
एक पत्रकार म्हणूनही खुशवंत सिंह (Khushwant Singh) यांनी चांगले नाव कमावले. १९५१ मध्ये ते आकाशवाणीत काम करत होते. त्यानंतर १९५१ ते १९५३ दरम्यान त्यांनी भारत सरकारच्या ‘योजना’ नावाच्या वृत्तपत्राचे संपादन केले. तसेच मुंबईत प्रकाशित होणारे इंग्रजी साप्ताहिक ‘इल्युस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ आणि ‘न्यू डेली’ यांचे ते १९८० पर्यंत संपादक होते. त्यानंतर त्यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ नावाच्या वृत्तपत्रात १९८३ पर्यंत संपादक म्हणून काम केले. या वृत्तपत्रात ते दर आठवड्याला एक लेख लिहायचे. त्यांचे लेख खूप लोकप्रिय झाले. हिंदुस्थान टाईम्स हे वृत्तपत्र आजही अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये सर्वत्र प्रकाशित होते. १९४७ पासून काही वर्षे खुशवंत सिंह यांनी भारतातील विदेश मंत्रालयातही महत्वाच्या पदांवर काम केले होते.
खुशवंत सिंह (Khushwant Singh) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. त्यांची यादी पुढीलप्रमाणे:
◆ १९७४ साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे होते. पण हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाबतीत केलेल्या कारवाईचा विरोध म्हणून त्यांनी केंद्र सरकारला परत केला.
◆ २००७ साली खुशवंत सिंह यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ २०१० साली त्यांना भारतातील साहित्य अकादमीचा फेलोशिप पुरस्कार देण्यात आला.
◆ २०१२ साली उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी खुशवंत सिंह यांना ‘अखिल भारतीय अल्पसंख्याक फोरमचा वार्षिक फेलोशिप’ अवॉर्ड दिला. २० मार्च २०१४ साली खुशवंत सिंह हे अनंतात विलीन झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.