LK advani Ram mandir : लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाणार नाहीत; कारण…

LK advani Ram mandir : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाणार नाहीत. अयोध्येतील खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. अडवाणी 96 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती पहाता हा निर्णय घेण्यात आला आहे.

314
LK advani Ram mandir : लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाणार नाहीत; कारण...
LK advani Ram mandir : लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाणार नाहीत; कारण...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आज (22 जानेवारी) राममंदिरातील रामलल्लाच्या अभिषेकाला उपस्थित रहाणार नाहीत. (LK advani Ram mandir) थंडी आणि खराब हवामानामुळे त्यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे. लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. (Ayodhya Rammandir)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : राम मंदिर सोहळा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कृष्ण गोपाल, रामलाल आणि आलोक कुमार या पदाधिकाऱ्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले होते. याप्रसंगी बोलताना अडवाणी म्हणाले होते, “अशा भव्य प्रसंगी उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली, ही खूप अभिमानाची बाब आहे.

काय म्हणाले होते लालकृष्ण अडवाणी ?

श्रीरामाचे मंदिर हे केवळ उपासनेचे मंदिर नाही, तर या देशाचे पावित्र्य आणि या देशाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याची ही संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या वर्षांनंतर, भारताच्या ‘स्व’चे प्रतीक आम्ही पुन्हा निर्माण केले. आमच्या पुरुषत्वाच्या आधारे आम्ही हे केले. आम्ही अनेक दशकांपासून आमची स्वतःची दिशा काय असावी, हे पकडण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही ते शोधले आणि ते स्थापित केले. प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशाचे वातावरण सुखद झाले आहे. आम्ही थेट तिथे असू, तो कार्यक्रम पाहू, त्यात सहयोग करू. हे एखाद्या जन्माचे फळ मला मिळत आहे. त्यामुळे मी तुमचे खूप आभार मानतो. मी नक्कीच तिथे असेन.”

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : आज अयोध्या सजली…; रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सिद्धता पूर्ण)

अयोध्येत आहे किमान तापमान

विश्व हिंदू परिषदेचे (VHP) आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अयोध्येतील सोहळ्यादरम्यान अडवाणी यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील, असे आयोजकांनी सांगितले होते.

अयोध्येत सकाळी 6 वाजता तापमान 8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकृतीच्या कारणाने लालकृष्ण अडवाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. (LK advani Ram mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.