धक्कादायक! नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात रंगली दारू पार्टी

नाशिकचे झाकीर हुसैन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  या पालिका रुग्णालयात कर्मचारी दारू पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील टेबलवर, दारु ग्लासेस, बाटल्या आणि इतर वस्तू पाहायला मिळाल्या. वर्षभरापूर्वी याच रुग्णालयामध्ये गॅस गळतीची दुर्घटना घडली होती. या दूर्घटनेत 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, या दुर्दैवी घटनेनंतरही कर्मचारी गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शूटिंग  पाहण्यात कर्मचारी व्यस्त

दारूची पार्टी करत हे कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होते. काही रुग्णांची सलाइन संपली होती. ते रुग्ण आवाज देत होते, पण जवळ एकही कर्मचारी नव्हता. त्यात या रुग्णालयाच्या इमारतीतत रात्री 11 ते पहाटे साडे चार वाजेपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. कर्मचारी ते शुटींग बघण्यात व्यस्त होते.

( हेही वाचा: योगी आणि भोगीबाबत मतपरिवर्तन कसे झाले? हा संशोधनाचा विषय! राऊतांचा राज ठाकरेंना टोला )

गॅस गळतीमुळे 22 जणांचा झाला होता मृत्यू

वर्षभरापूर्वी नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले होते. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here