ठाणे – कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन करत संतप्त रेल्वे प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. रेल्वे पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि प्रवाशांना बाजूला करत लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने प्रवासी आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा कारशेड मधून सव्वा आठ वाजता ठाणे- सीएसमटी लोकल सुटते. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडमधून बसून प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती. दरम्यान, कळवा कारशेड येथून ज्या लोकल निघतात आणि पुढे ठाणे ते सीएसएमटी जातात. त्यात कळव्यातील अनेक प्रवासी प्रवास करतात. मात्र आता यापैकी एक लोकल एसी लोकल म्हणून धावणार आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना या ट्रेनमध्ये चढता आले नाही.
(हेही वाचा – जखमी गोविंदांवर मोफत उपचार! शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आदेश)
दरम्यान, पाचवा, सहावा ट्रॅक करून देखील कळवा येथून लोकल सुटत नाही किंवा फास्ट लोकल देखील थांबत नाही, त्यामुळे ठाणे स्थानकाप्रमाणे कळवा येथून देखील लोकल सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी करत हे आंदोलन केले. मात्र आजची एसी लोकल बघून प्रवासी संतापले. त्यांनी एसी लोकल बाहेर पडू दिली नाही, शेवटी जबरदस्तीने आरपीएफ आणि जीआरपी यांना बळाचा वापर करून गर्दी बाजूला एसी लोकल रवाना करण्यात आली.
Join Our WhatsApp Community