राज्यात कधीही जाहीर होणार लॉकडाऊन… आजच नियमावली तयार होणार!

78

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण या उपायांनाही पुरेसे यश येत असल्याने राज्य सरकार लॉकडाऊनच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता असून, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

काय म्हणाले अस्लम शेख?

इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल. गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. मुंबई शहरामध्ये किंवा राज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे, अशी माहिती कॉंग्रेस आमदार आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख म्हणाले.

(हेही वाचाः लॉकडाऊनची तयारी… १४ एप्रिलनंतर होणार निर्णय?)

मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही ५० हजाराच्या वर जात आहे. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड तोण पडत आहे. कित्येक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि व्हंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांवर तातडीचे उपचार होणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते. रविवारी राज्याच्या टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्य जाहीर करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.